Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकमध्ये अहमदियांनी स्वत:ला मुसलमान समजल्यास कारावासाची शिक्षा !

जातीव्यवस्थेच्या नावावर हिंदु धर्माला लक्ष्य करणारे 
 पुरोगामी मुसलमानांच्या या कट्टरतावादावर का बोलत नाहीत ?
     
     इस्लामाबाद - पाकमध्ये अहमदियांना स्वत:ला मुसलमान समजण्याचा अधिकार नाही. कोणी अहमदिया स्वत:ला मुसलमान समजत असल्यास कायद्यानुसार त्याला कारावासही होऊ शकतो. याला अहमदिया असलेले पाकचे पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ प्रा. अब्दुससलामही अपवाद नव्हते. पाकमध्ये त्यांच्याकडेही तब्बल ३० वर्षे दुर्लक्ष करण्यात आले. 

     वर्ष १९७९ मध्ये शेल्डन ग्लाशो आणि स्टीवन वाइनबर्ग यांच्यासह प्रा. अब्दुससलाम यांना संयुक्तपणे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. त्यांच्या शोधानेच ‘दैवी कणा’च्या संशोधनाला गती मिळाली होती. ते केवळ पाकिस्तानचे पहिले नोबेल प्राप्त शास्त्रज्ञच होते असे नाही, तर हा पुरस्कार मिळवणारे पहिले मुसलमानही होते. असे असतांना केवळ अहमदिया होते; म्हणून त्यांचा अभिमान बाळगण्याचे आजपर्यंत पाकने टाळले. कट्टरतावाद्यांच्या दबावामुळे त्यांना त्यांच्या हयातीत पाकच्या कोणत्याही विद्यापिठात साधे शिकवताही आले नाही. अशा अब्दुससलाम यांचे नाव इस्लामाबादच्या ‘कायद-ए-आझम’ विद्यापिठाच्या राष्ट्रीय भौतिकशास्त्र केंद्राला देण्यास पाकच्या नवाझ शरीफ सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. असे प्रथमच होत आहे. 
पारंपारिक मुसलमानांचे अहमदिया समुदायाशी मतभेद का आहेत ? 
 अहमदियांच्या मतानुसार इस्लामचे प्रवर्तक महंमद यांच्यानंतरही एक पैंगंबर झाले, तर पारंपरिक मुसलमान समजतात की, महंमद हेच शेवटचे पैगंबर होते. या कारणामुळे पाकच नाही, तर अनेक इस्लामी देशांमध्येही अहमदिया लोकांना अत्याचार सहन करावे लागले. ‘अहमदिया मुसलमानाला ठार केल्याने ‘जन्नत’ (स्वर्ग) मिळते’, असे फतवेही पाकमधील मौलवींनी काढले आहेत. 
     वर्ष १९७४ मध्ये एक कायदा करून अहमदियांना मुसलमानेतर ठरवण्यात आले. त्यांची कब्रस्थानेही निराळे आहेत. पूर्वी ज्या अहमदियांना मुसलमानांच्या कब्रस्थानात पुरण्यात आले होते, त्यांच्या शवांनाही नंतर उकरून काढण्यात आले. एवढेच नव्हे, तर एखादा अहमदी कोणाला ‘अस्सलाम अलेकुम’, असे म्हणत अभिवादन करत असेल, तरी त्याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते. त्यांच्या विरोधात एखाद्याने खोटी तक्रार जरी प्रविष्ट केली, तरी विनाचौकशी त्यांना पोलीस अटक करू शकतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn