Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पू. नेनेआजी यांच्या लक्षात आलेली त्यांची कन्या श्रीमती सुधा देशमुख यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

सनातनच्या ३६ व्या संत पू. नेनेआजी यांच्या कन्या श्रीमती सुधा 
(अनुपमा) देशमुख यांचा आज १६.१२.२०१६ या दिवशी दिनांकानुसार 
वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्रीमती सुधा देशमुख यांना सनातन परिवाराचा नमस्कार !
     देवद आश्रमात वास्तव्यास असणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. नेनेआजी यांच्या श्रीमती सुधा (अनुपमा) देशमुख या कन्या आहेत. १९.११.२०१६ या दिवशी पू. नेनेआजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये त्यांच्या आठवणी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात त्यांची कन्या श्रीमती सुधा (अनुपमा) देशमुख यांचा उल्लेख आला नव्हता. हे सुधा यांनी वाचल्यावर त्यांनी पू. नेनेआजींना त्याची आठवण करून दिली. तेव्हा पू. आजींना पुष्कळ वाईट वाटले. त्या म्हणाल्या, सुधाने माझ्यावर केलेल्या अनंत उपकारांविषयी मला विस्मरण कसे झाले ? माझ्या हातून अशी कशी चूक झाली ? असे म्हणतांना त्यांना पुष्कळ खंत वाटत होती. तिच्याविषयी कशी कृतज्ञता व्यक्त करायची ?, या विवंचनेतच त्यांनी मला बोलावले आणि याविषयी सांगितले. त्या म्हणाल्या, मला सुधाविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तिने मला सांभाळले आहे. मला कसे काय तिच्याविषयीच्या स्मृतींचे विस्मरण झाले, मला कळलेच नाही. माझ्या हातून मोठी चूक झाली आहे. आपण तिच्याविषयी कृतज्ञता म्हणून लिहूया. पू. आजींनी सांगितलेल्या त्यांच्याविषयीच्या काही आठवणी येथे दिल्या आहेत. - सौ. आनंदी पांगुळ (२९.११.२०१६)
१. अभिनय कौशल्य
     सुधा लहान असतांना तिने नाटक बसवले होते. टांगा निघाला.. आणि अष्टनायका.. या गाण्यांच्या वेळी तिने केलेला अभिनय आजही आठवतो. सुधा दिसायला देखणी आहे. तिने तुझे आहे तुझपाशी या नाटकात अभिनयही केला होता. ती अतिशय हुशार आहे. आज ती ७० वर्षांची आहे; पण कुणालाही तिचे वय ओळखता येणार नाही. ती पुण्यात रहाते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत. मुलगा डॉक्टर असून इंग्लंडमध्ये रहातो. मुलगी तिच्या शेजारीच रहाते. 
२. आधार देणे
      माझे यजमान गेले, तेव्हाही मी सुधाकडेच होते. मी तिच्याकडे बर्‍याच वेळा रहात असे. माझे जावईसुद्धा पुष्कळ चांगले होते. ते मला नेहमी म्हणायचे, आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत, तर इकडेच रहायला या. माझ्या यजमानांच्या मृत्यूनंतर मला माझे घरही पोरके झाले होते. मला कोणी सांभाळायला सिद्ध नव्हते. तेव्हा मी सुधाला म्हटले, सुधा, मला रहायला घर नाही गं ! तेव्हा ती म्हणाली, हे घर (तिचे घर) तुझेच आहे. आपण दोघी या घरात राहू. जावयांनीही मला त्यांच्याच घरी रहाण्याची विनंती केली. मी त्यांच्याकडेच राहिले. त्या वेळी माझी मुलगी सुधा हिनेच मला आधार दिला. जीवनातील महत्त्वपूर्ण वेळेपासून आतापर्यंत ३२ वर्षे तिनेच मला सांभाळले. माझी सर्व दुखणी तिने काढली. मला काही झाले, तरी ती मला दवाखान्यात नेत असे. तिने मला कधीच काही न्यून (कमी) पडू दिलेले नाही. एकदा मला कावीळ झाली होती. त्यात मला चक्करही येत असे. तेव्हा तिने मला पुष्कळ चांगल्या प्रकारे सांभाळले. तिच्यामुळेच मला माझे दुखणे जाणवलेही नाही. मी बरी झाले आणि तिच्या यजमानांना कावीळ झाली. 
३. यजमानांच्या मृत्यूप्रसंगी स्थिर असणे
     माझे यजमान गेल्यानंतर ४ वर्षांनी, म्हणजे १९८० मध्ये सुधाचे यजमान गेले. तिच्या यजमानांच्या मृत्यूच्या वेळी तिने स्वतःच सर्वांना संपर्क करून कळवले. ती रडत बसली नाही. मला म्हणाली, आई, मला रडायला वेळ नाही. पुढचे सर्व करायचे आहे. सुधा करारी आहे. 
४. न्यायालयाद्वारे चरितार्थासाठी पैसे मिळवून देणे
     चरितार्थासाठी मला माझा हक्क मिळावा, यासाठी तिने मला न्यायालयाद्वारे न्याय मिळवून दिला. तिच्यामुळेच मला कशाची काळजी नाही. 
५. प्रेमभाव
     तिनेच मला देवद आश्रमात आणले. मी इथे आल्यापासून ती मला नियमित भेटायला येते. येतांना आश्रमातील साधकांसाठी आणि माझ्यासाठी खाऊ आणते. - पू. नेनेआजी (आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn