Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरासाठी रामनाथी आश्रमात आलेल्या सिंगापूर येथील श्रीमती मुदिता यांचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती

१. अभ्यास आवडेनासा झाल्यावर ‘तो 
आध्यात्मिक त्रास आहे’, असे वाटणे आणि त्रासातून 
बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधतांना बौद्ध तत्त्वज्ञानाशी ओळख होणे 
     ‘माझ्या १२ ते १६ वर्षे या वयात मला अभ्यास आवडेनासा झाला आणि ‘हा त्रास आहे’, असे मला वाटू लागले. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मी मार्ग शोधत होते. वयाच्या २० व्या वर्षी बौद्ध तत्त्वज्ञानाशी माझी ओळख झाली आणि ‘त्रासातून बाहेर पडण्याचा तो मार्ग आहे’, हे मला समजले. बुद्धांनी जे काही शिकवले आहे, ते देवळांमध्ये दिसून न आल्याने त्याचा मी शोध घेण्यास आरंभ केला.
श्रीमती मुदिता
२. रक्ताचा कर्करोग झाला असल्याचे निदान 
झाल्यावर योगासने केल्यावर प्रकृतीत सुधारणा होणे 
     या काळात मला ‘रक्ताचा कर्करोग (ल्यूकेमिया) झाला आहे’, असे निदान झाले. या काळात मी प्रयत्न करून योगासने शोधून काढली आणि ती करायला आरंभ केला. यामुळे माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली. 
३. एस्.एस्.आर्.एफ्.शी संपर्क 
    सँडी या माझ्या मैत्रिणीने मला चंदनाचे अत्तर दिले आणि एस्.एस्.आर्.एफ्.ची ओळख करून दिली. त्यानंतर मी एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ नियमित वाचायला आरंभ केला. संकेतस्थळावरील संशोधनात्मक माहिती आणि करता येण्यासारखे उपाय पाहून एस्.एस्.आर्.एफ्.कडे आकर्षित झाले. साधनेमुळे मला आध्यात्मिक पातळीची माहिती झाली आहे. ‘लोकांना नकारात्मकता आणि अनिष्ट शक्तींच्या प्रभावातून बाहेर कसे काढायचे ?’, हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. 
४. अनुभूती 
४ अ. एस्.एस्.आर्.एफ्.च्या पहिल्या सत्संगात स्वतःत पालट करता येण्याजोगे सोपे उपाय कळणे : ‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या पहिल्या प्राथमिक सत्संगात मला अर्धा घंटा नामजप करायला सांगण्यात आले होते. मला स्वतःला पालटायची पुष्कळ इच्छा होती; पण त्याचा मार्ग सापडत नव्हता. पहिल्यांदा ज्या वेळी मी एस्.एस्.आर्.एफ्.च्या सत्संगाला उपस्थित राहिले, तेव्हा मला स्वतःत पालट करता येण्याजोगे सोपे उपाय कळले. या वेळी मला स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेची माहिती दिली.
४ आ. राग वा भीती उफाळून आल्यावर ‘दत्ताचा जप साहाय्य करील’, अशी भावना ठेवून श्रद्धापूर्वक जप करणे आणि नामजपामुळे आणि सत्संगानंतर ताण अन् थकवा न जाणवता उत्साह वाटणे : या सत्संगानंतर आम्ही जवळच्या देवळात पुष्कळ सेवा आणि कार्य केले. यापूर्वी देवळात सेवा करून जेव्हा मी दमत असे, तेव्हा मला स्वतःची कीव यायची आणि मी चिडचिड करत असे. एस्.एस्.आर्.एफ्.च्या सत्संगानंतर जेव्हा राग वा भीती उफाळून यायची, तेव्हा ‘दत्ताचा जप मला यात साहाय्य करील’, ही भावना ठेवून मी श्रद्धापूर्वक जप करू लागले. त्या वेळी ‘ईश्‍वर माझे अहं-निर्मूलन करवून घेत आहे’, असे मला वाटत असे. त्यानंतर मला पुष्कळ उत्साही वाटू लागले आणि देवळातील आठवडाभराच्या सेवांच्या कालावधीत मला कधीही ताण अन् थकवा जाणवला नाही. माझ्यातील हा पालट एस्.एस्.आर्.एफ्.च्या सत्संगानंतर झाला आहे.
४ इ. परीक्षेत काही न आठवल्याने मुलाला उत्तरपत्रिकेत काही लिहिता न येणे; पण दत्ताचा नामजप केल्यावर त्याला चांगले गुण मिळणे : माझा मुलगा परीक्षेत काही न आठवल्याने उत्तरपत्रिकेत काही लिहू शकत नाही. त्यामुळे त्याला अल्प गुण मिळतात. यावर मी त्याला १५ मिनिटे दत्ताचा जप आणि मीठ-पाण्याने अंघोळ करण्याचे उपाय सांगितले. यामुळे सहामाही परीक्षेत ज्या वेळी त्याने जप केला, त्या विषयात त्याला चांगले गुण मिळाले.’
५. इतर सूत्र 
      आश्रमात आल्यावर ‘सगळ्या साधकांमध्ये तळमळ आहे’, असे मला वाटते.’
- श्रीमती मुदिता, सिंगापूर (१४.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn