Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोल्हापूर येथील विद्यापिठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करा ! - हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

     कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्राचे प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी दिले. या निवेदनात मागणी करतांना म्हटले आहे की, काँग्रेसच्या कार्यकाळात १८ नोव्हेंबर १९६२ ला स्थापन झालेल्या विद्यापिठाच्या नावात ५४ वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख होणे हे तमाम शिवप्रेमींसाठी वेदनादायी आहे. त्यामुळे ‘शिवाजी विद्यापिठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे नामांतर करण्यासाठी आपण उचित कार्यवाही त्वरित करावी.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn