Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

धर्माचरण आणि धर्मकार्य करण्यासाठी उद्युक्त झालेले पुणे येथील धर्माभिमानी

नोव्हेंबर २०१६ मधील सनातन संस्थेचे पुणे जिल्ह्यातील प्रसारकार्य
     काल आपण नोव्हेंबर २०१६ या मासातील सनातन संस्थेचे पुणे जिल्ह्यातील प्रसारकार्य या लेखाचा पहिला भाग पाहिला. उर्वरित भाग आज पाहू.
३. साप्ताहिक आणि दैनिक सनातन प्रभातच्या वाचकांचा प्रतिसाद
३ अ. दैनिक सनातन प्रभातविषयी आदर असणारे श्री. रामकृष्ण जोशी ! : श्री. रामकृष्ण जोशी यांना दैनिक सनातन प्रभातविषयी आदर आहे. ते म्हणाले, ‘‘मी प्रतिदिन माहितीजालावर (इंटरनेटवर) दैनिक वाचतो; पण प्रत्येक मासाच्या वर्गणीतून आमचा सहभाग होतो. अन्य कुठेही पैसे देण्यापेक्षा सनातन संस्थेच्या कार्यासाठी व्यय झालेले अधिक चांगले आहे.’’ ३ आ. वडिलांचे देहावसान होऊनही त्या सप्ताहात अर्पण देणारे श्री. राघवेंद्र जोशी ! : श्री. राघवेंद्र जोशी हे वाचक दरमहा अर्पण देतात. ऑक्टोबर मासात त्यांच्या वडिलांचे देहावसान झाले. त्या सप्ताहात त्यांच्याकडे साप्ताहिक सनातन प्रभात द्यायला गेल्यावर त्यांच्या पत्नीने सासरे गेल्याचे सांगून दुखवटा असूनही ‘‘तुम्ही या मासातील अर्पण घेऊन जा’’, असे सांगितले.
३ इ. सनातन प्रभातमधील लेख वाचून आपल्या सैनिकांच्या हत्या होत असतांना फटाके वाजवणेे योग्य नसल्याची जाणीव झालेले वाचक : वडगाव, सिंहगड येथील वाचक श्री. कुढळे यांना संपर्क करून विज्ञापन देण्यासंदर्भात विचारल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ‘‘ज्या धर्मात आपण जन्माला आलो, त्या धर्मासाठी करायचे नाही, तर कोणासाठी करायचे ?’’ सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखावरून काश्मिरमध्ये असलेल्या सैनिकांविषयी त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘प्रतिवर्षी मी पुष्कळ फटाके उडवतो. मला फटाके वाजवायला आवडतात; पण ‘आपल्या सैनिकांच्या हत्या होत असतांना फटाके वाजवणेे योग्य नाही’, याची जाणीव सनातन प्रभातमधील लेख वाचून झाली.’’
३ ई. कन्नड साप्ताहिक सनातन प्रभातमधील देहदान न करण्याविषयीची माहिती वाचून देहदान करण्याचा निर्णय पालटणारे एका वाचकाचे नातेवाईक : कन्नड साप्ताहिक सनातन प्रभातच्या एका वाचकांनी साप्ताहिकातील ‘देहदान का करू नये ?’ याविषयी माहिती वाचली. त्यांचे एक नातेवाईक देहदान करणार होते. त्यांनी त्यांच्या नातेवाइकांना हा विषय सांगितल्यावर त्यांनी देहदान करण्याचा निर्णय पालटला.
३ उ. साप्ताहिक सनातन प्रभातमधील दिवाळीविषयी माहिती वाचून त्यानुसार कृती करणारे वाचक ! : दोन वाचकांना विचारले, ‘‘दिवाळीच्या काळात पोस्टाने पाठवलेले साप्ताहिक सनातन प्रभात मिळाले ना ?’’ त्यावर त्यांनी सांगितले, ‘‘दिवाळीच्या आदल्या दिवशीच ते मिळाल्यामुळे त्यातील माहिती वाचून त्यानुसार कृती करता आली.’’
३ ऊ. सनातनच्या सात्त्विक उदबत्तीचे महत्त्व जाणणारे श्री गजानन मंदिराचे ट्रस्टी : श्री. पटेल हे गुजराती मासिक सनातन प्रभातचे वाचक आहेत. ते सनातनची उदबत्ती नियमित वापरतात. त्यांचा पाणीपुरी आणि दाबेली विकण्याचा व्यवसाय आहे. ते गाडीवरही उदबत्ती लावतात. ते गाडी श्री गजानन मंदिरापासून थोड्या अंतरावर उभी करतात. एकदा उदबत्तीचा सुगंध आल्याने मंदिराचे ट्रस्टी त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही लावलेल्या उदबत्तीचा सुगंध चांगला आहे. त्यामुळे पुष्कळ चैतन्य आणि सात्त्विकता जाणवते. अगदी मंदिरापर्यंत सुगंध येतो.’’ त्यांनी उदबत्तीच्या १० मोठ्या पुड्यांची मागणी दिली.
४. अन्य
४ अ. सनातन-निर्मित अष्टदेवतांच्या चित्रांचे परीक्षण करणारे डाऊझिंग (dowsing) चे अभ्यासक श्री. अरविंद
कुलकर्णी ! :
डहाणूकर कॉलनीतील श्री. अरविंद कुलकर्णी हे डाऊझिंग (dowsing) चे अभ्यासक आहेत. त्यांनी सनातन-निर्मित अष्टदेवतांच्या सर्व चित्रांचे परीक्षण (रिडींग) केले आहे. त्यांनी सांगितले, ‘‘ही चित्रे अतिशय सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करणारी आहेत.’’ ते त्याविषयी लेख लिहून देणार आहेत. त्यांची डॉऊझिंग (dowsing) चा अभ्यास साधकांना शिकवण्याची सिद्धता आहे.
४ आ. सनातन प्रभातमधील सण-उत्सव यांमागील शास्त्र, तसेच राष्ट्र-धर्म यांविषयीचे लेख ‘शिवतेज’ या मासिकात छापणारे श्री. दत्तात्रय सुर्वे ! : संपादक श्री. दत्तात्रय सुर्वे ‘शिवतेज’ या मासिकात सनातन प्रभातमध्ये छापून आलेले सण-उत्सव यांमागील शास्त्र, तसेच राष्ट्र-धर्म यांविषयीचे लेख नियमित छापतात. ते सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे धर्मरथाद्वारे होणारेे प्रदर्शन आदींच्या वार्ता मासिकात देतात. ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीची माहिती त्यांच्या मासिकात छापणार आहेत.’
- सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, प्रसारसेवक, सनातन संस्था. (समाप्त)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn