Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिल्ली पब्लिक स्कूलच्या विज्ञापनात विद्यार्थिनीला ‘नन’च्या वेशात दाखवून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न !

  • हिंदूंनो, तुमच्या पाल्यांना अशा शाळांत घालून ‘ख्रिस्ती’ बनवायचे आहे का, ते ठरवा !
  • शाळेत योगाभ्यासाला विरोध करणारे धर्मनिरपेक्षवादी याविषयी गप्प रहातात, हे लक्षात घ्या !
विज्ञापनामध्ये एका छोट्या मुलीला
‘नन’च्या वेशात दाखवणारा फलक
     पनवेल - येथील ‘दिल्ली पब्लिक स्कूल’च्या नर्सरी ते इयत्ता ८ वीपर्यंतच्या प्रवेशासाठी लावण्यात आलेल्या विज्ञापनामध्ये एका छोट्या मुलीला ‘नन’च्या वेशात दाखवण्यात आले आहे. यामुळे हिंदुद्वेषी ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा अंतस्थ प्रयत्न उघड झाला आहे. (शिक्षणसंस्थेच्या विज्ञापनात विद्यार्थ्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा अधिवक्ता झालेले दाखवण्यात येते. या विज्ञापनातून मात्र ‘या शाळेत शिक्षण घेऊन ‘नन’ बना !’, असेच सुचवायचे आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांचे कसे ख्रिस्तीकरण केले जाते, याचा या चालता-बोलता पुरावा आहे ! शासनकर्ते याची नोंद घेतील का ? - संपादक)
     तसेच त्यावर ‘अ स्कूल वेअर कंपॅशन इझन्ट टॉट, इट इज इव्होक्ड’ (अशी शाळा जेथे इतरांविषयी अनुकंपा कशी निर्माण करावी, हेे शिकवले जात नाही, तर ती तुमच्यात निर्माण करते.) असे वाक्य लिहिण्यात आले आहे. (ख्रिस्ती पंथ हा दया आणि शांतीचे प्रतीक असल्याचा निर्माण केलेला बागुलबुवा आहे. ख्रिस्त्यांनी जगभर केलेली युद्धे, विदेशात चर्चने स्त्रियांवर केलेले अनन्वित अत्याचार, गोव्यात धर्मांतर न करणार्‍या हिंदूंवर केलेले अत्याचार याविषयी असंख्य पुरावे हे ख्रिस्त्यांच्या दयेच्या भ्रमाचा भोपळा फोडणारे आहेत ! - संपादक)
     मुलीला ‘नन’च्या वेशात दाखवण्यामागे मुलांच्या मनात त्याविषयी आकर्षण निर्माण करून धर्मांतराचा अंतस्थ हेतू असल्याचा संशय व्यक्त करणारे असल्याने याविषयी शिक्षण संस्थेने खुलासा करून अशा प्रकारचे विज्ञापन त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने करण्यात येत आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या बालमनात संभ्रम निर्माण करणारे चित्र न काढल्यास हिंदु पालक त्यांच्या मुलांना या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याविषयी विचार करतील, अशी चेतावणी हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने देण्यात आली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn