Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज (वय ८९ वर्षे) !

प.पू. पांडे महाराज
      परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या या साधनेच्या विश्‍वातील एक उच्च विभूती म्हणजे प.पू. परशराम माधव पांडे महाराज (प.पू. बाबा) ! ३० नोव्हेंबर २०१६, म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी त्यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांचे चरणी उतराई होण्यासाठी देवद आश्रमातील साधकांनी ही शब्द सुमनांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिखाण म्हणजे देवद आश्रमातील सर्व साधकांचे मनोगत आहे. त्यातील काही सूत्रे आपण ३० नोव्हेंबर या दिवशी पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

 १ इ ११. सर्वज्ञता 
     अ. एकदा धान्य निवडण्याच्या कक्षाच्या बाहेरील परिसरात काही साधकांनी फ्लेक्स अव्यवस्थित ठेवला होता. प.पू. बाबांनी त्याविषयी तेथील साधकांना जाणीव करून दिली. त्या वेळी लक्षात आले की, त्या फ्लेक्सच्या खाली एक मोठा साप होता. कदाचित तो फ्लेक्स वेळीच काढला नसता, तर तो साप आश्रमातसुद्धा येऊ शकला असता. प.पू. बाबा अशा अनेक गोष्टी लक्षात आणून देत असतात. त्यांच्यातील सर्वज्ञता सामान्य बुद्धीला कळूच शकत नाही.
     आ. एकदा भाजी खरेदी करून आल्यानंतर आणलेल्या फ्लॉवरला दुर्गंध येत होता. त्या वेळी संबंधित साधकाला त्यांनी विचारले, अशी भाजी का आणली ? त्या वेळी त्यांनी प.पू. बाबांना अशीच मिळाली, असे उत्तर दिले. त्यावर ते त्या साधकाला म्हणाले, व्यवस्थित विचार कर, भाजी मिळाल्यानंतर ती गाडीत ठेवतांना तुझे लक्ष नव्हते का ? फोनवर बोलत होतास का ? हे सत्य होते. साधकाकडून असेच झाले होते. भाजी पाहून घेतली नव्हती. त्यानंतर त्या साधकाने प.पू. बाबांची येऊन क्षमा मागितली.
     इ. मनातील जाणणे : मला कधीही त्रास झाला, तरी त्यांना काही सांगितलेले नसतांनाही ते बरोबर ओळखतात. लगेच उपाय, प्रार्थना सांगतात आणि त्रास उणावेपर्यंत ते उपाय करायलाच लावतात. एकदा मला त्रास होत असतांना सेवेत पुष्कळ अडचणी येत होत्या आणि मला सेवा करायला जमणार नाही, असा नकारात्मक विचार मनात आला. त्यानंतर मी त्यांच्या खोलीत उपायांसाठी गेले होते. त्या वेळी त्यांनी मला विचारले काय होेते ? तेव्हा मी त्यांना सांगितले, त्रास होत आहे. त्यावर त्यांनी मला पुढील प्रार्थना लिहून ती करण्यास सांगितली. हे भगवन, अपने मन के वश में होकर, मैंने जो न करने योग्य अत्यंत पापपूर्ण चिंतन किया हो, उसे शांत कीजीए ! त्यानंतर माझ्या मनाची स्थिती सुधारली. माझ्या मनात नकारात्मक विचार येत आहेत, हे मी न सांगताच प.पू. बाबांना कळले.
- सौ. अश्‍विनी अतुल पवार

     ई. मनातील अचूक ओळखणे : साधकाच्या मनातील चुकीचा विचार सांगण्यासमवेतच काही वेळा स्थुलातील साधकाने न सांगितलेली माहितीही प.पू. महाराज अचूक सांगतात. त्यांना एकदा एक साधिका आणि तिचे साधक नसलेले पती भेटायला आले होते. तेव्हा पहिल्याच भेटीत साधिकेच्या पतीला तुम्हाला २ लाख रुपये पगार मिळतो ना, असे सांगितले. तेव्हा साधिकेचे पती एकदम अवाक झाले. त्यांच्याशी काही ओळख नसतांनाही त्यांना कसे कळले माझ्या नोकरीविषयी ? असे त्यांना वाटले. 
- श्री. यज्ञेश सावंत
      उ. प.पू. बाबांना सर्वच कळते याचा अनुभव मला आणि माझ्यासारख्या अनेक साधकांनाही आला आहे. एखादा प्रश्‍न प.पू. बाबा विचारतात आणि पुढच्याच क्षणी स्वत:च त्याचे उत्तर देऊन तसेच आहे ना, असे विचारतात. प.पू. बाबांनी सांगितलेले उत्तर अचूकच असते. त्यांच्या सेवेत असणार्‍या साधकाच्या मनातील विचारही प.पू. बाबा अचूक ओळखतात. एखाद्याची स्थिती चांगली नसेल, तर लगेच ओळखतात आणि त्याला त्यातून बाहेर काढतात.
     ऊ. एक साधिका गावाहून आली होती. तेव्हा सेवेत असणार्‍या साधकासमवेत पहाटे फेर्‍या मारतांना प.पू. बाबांनी त्या साधिकेला पाहिले. तेव्हा त्यांच्यासमवेत असणार्‍या श्री. सचिन हाके यांना प.पू. बाबा म्हणाले, अरे सचिन, तिला थांबव थांबव ! तिच्या बॅगमध्ये पेढे आहेत ! खरेच त्या साधिकेच्या बॅगमध्ये पेढे असल्याचे तिने त्या वेळी सांगितले. 
- श्री. संदेश नाणोसकर
     ए. एकदा मला काय त्रास होत होते, हे कळत नव्हते. सेवाही नीट होत नव्हती, तसेच उपायांचा कालावधीही पूर्ण झाला नव्हता. त्या वेळी मी त्यांच्या खोलीत उपायांना गेले होते. त्यांनी मला लगेच सांगितले, मी सांगतो, ती प्रार्थना कर. ती प्रार्थना अशी होती, हे चैतन्यमूर्ते, तूच माझे शरीर निर्माण केले आहेस. तूच माझ्यात विलसत आहेस. मी तुला शरण आले आहे. तू सर्व दृष्टीने समर्थ आहेस. मला जी शक्ती त्रास देत आहे, ती नष्ट कर आणि तुझ्या सेवेची संधी दे..! अशी प्रार्थना केल्यानंतर १० ते १५ मिनिटांतच मला पुष्कळ चांगले वाटले आणि मी पुन्हा सेवेला गेले. त्रासासंदर्भात मी प.पू. बाबांना काहीच सांगितले नव्हते. ते सर्व जाणतात. त्यांची सर्वज्ञता आपल्या अल्प मतीला ज्ञातही होऊ शकत नाही.
- कु. स्नेहा झरकर
     ऐ. मी काही दिवस चिपळूण येथे उपचारांसाठी आणि काही दिवस रामनाथी येथे शिकण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर मी प.पू. बाबांकडे गेल्यावर त्यांनी सर्व विचारपूस केली. काय काय उपचार केले ? रामनाथी येथे काय शिकलास ? मी सांगण्यास आरंभ केल्यावर मी जे काही सांगणार होतो, ते प.पू. बाबांनी आधीच सांगितले. मी त्यांना म्हणालो, बाबा, तुम्ही जे सांगितले, तेच तेथे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, अरे मी तिथे होतो. तू मला पाहिले नाहीस का ? यावरून देव सतत आपल्या सोबत असतो, आपणच अनुभवायला कमी पडतो, हे त्यांनी शिकवले.
- श्री. सचिन हाके (२२.११.२०१६)
२. देवद आश्रमातील साधकांना घडवणारे देवद आश्रमाचे आधारस्तंभ प.पू. पांडे महाराज ! 
     २ अ. चुका सांगण्याची आगळीवेगळी पद्धत : सेवेतील साधकाची अथवा भेटायला आलेल्या साधकाकडून काही चूक झाली असल्यास आणि त्याची मन:स्थिती ठीक नसल्यास प.पू. महाराज आज माझ्याकडून अमूक चूक झाली किंवा आज माझी स्थिती ठीक नाही, असे म्हणतात. तेव्हा प्रथम त्या साधकाच्या तोंडवळ्यावरील हावभाव प्रश्‍नार्थक होतात. नंतर ते आपलीच (साधकाची) चूक सांगत आहेत, हे साधकाच्या लक्षात येते अन् साधक शिकण्याच्या स्थितीत येतो. एखाद्या वेळी साधकाच्या अंतर्मनातील चुकीचा विचार प.पू. पांडे महाराज थेट सांगून सावध करतात. तेव्हा साधकालाही प्रथम जाणीव नसते. थोड्या वेळाने चिंतनानंतर अशी विचारप्रक्रिया झाली होती, हे त्याच्या लक्षात येते आणि साधक कृतज्ञता व्यक्त करतो.
- श्री. यज्ञेश सावंत (क्रमशः)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn