Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सेवाभावी आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असलेलेे नंदू मुळ्येकाका !

         नंदू मुळ्ये (मुळ्येेकाका) आणि आम्ही (मी आणि श्री. पाध्येकाका) एकाच वेळी साधनेत आलो. मी आणि श्री. पाध्येकाका प्रथम गुरुपौर्णिमेच्या प्रसाराला गेलो, ते मुळ्येकाकांच्याच घरी. वर्ष १९९६ मध्ये सांगलीला असलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. त्यानंतर ते सत्संगात येऊ लागले. आम्ही प्रथम सत्संगात गेलो, ते त्यांच्यासह. म्हणजे साधनेचा श्रीगणेशा त्यांच्यासमवेतच गिरवला.
         आमचे आणि मुळ्येकाकांचे घर जवळजवळ होते. त्यामुळे आमचे संबंध घरच्यासारखे होते. काही वर्षांनी श्री. पाध्येकाका अध्यात्मप्रसारासाठी बाहेरगावी गेल्याने पनवेलमधील सत्संग घेणे, नवीन सत्संग चालू करणे, ग्रंथांचे स्टॉललावणे, प्रवचन घेणे अशा प्रत्येक सेवेत मुळ्येकाका आणि मी समवेत असायचो. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आम्हाला दोघांनाही धक्का बसला.
         मुळ्येकाका सेवाभावी होते. ते कोणतीही सेवा करण्यास सिद्ध असायचे. आश्रमात स्वच्छतेची सेवा असो, चहा करण्याची असो, अल्पाहाराची असो किंवा पहार्‍याची सेवा असो, प्रत्येक सेवेला ते सिद्ध असायचे. 
- सौ. अनघा पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०१६)
अखरेच्या श्‍वासापर्यंत सनातनच्या
आश्रमात रहाण्याची इच्छा असणारे मुळ्येकाका !
         वर्ष २०१५ मध्ये आम्ही गोव्याला येण्यापूर्वी एकदा मी त्यांना सहज म्हटले, मुळ्येकाका, तुमच्याकडे पाहून शांत वाटते. चांगले वाटते. तुमचीसुद्धा पातळी ६० टक्के झाली असेल, असे वाटते. त्यावर ते मला म्हणाले होते, काकू, माझ्यात पुष्कळ दोष आणि अहं आहे; पण अखेरचा श्‍वास आश्रमातच घ्यायला मिळावा, असे वाटते. आज त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकल्यावर त्यांचे बोलणे आठवले.
- सौ. अनघा पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn