Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नोटाबंदीचा निर्णय म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या सत्तेच्या अंताचा प्रारंभ ! - हिंदु महासभा

        नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूंच्या लग्नसराईला प्रारंभ होण्यापूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला. तसेच भाजपचे नेते आता इस्लामिक बँकिंगला प्रोत्साहन देत आहेत. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे मोदी यांच्या सत्ताकाळाच्या शेवटाला प्रारंभ झाला आहे, अशी टीका अखिल भारतीय हिंदु महासभेच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. 
        हिंदु महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी म्हटले आहे की, सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामागील उद्देश अद्याप समजलेला नाही. सरकारच्या या निर्णयामुळे २००-३०० रुपये कमावणार्‍या आणि सरकारी योजनांवर अवलंबून असलेल्या लोकांना फटका बसतो आहे. यामुळे श्रीमंतांना कोणताही त्रास झालेला नाही. हिंदूंच्या लग्नसराईचे मुहूर्त चालू होण्याआधी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घोषित केला. त्यामुळे अनेक लोकांना याचा फटका बसला आहे. लोकांना त्यांच्या मित्रांकडून, नातेवाइकांकडून पैसे घ्यावे लागले. काहींना लग्नकार्य पुढे ढकलावे लागले. ऐन लग्नसराईच्या काळात हिंदूंना इतका त्रास सहन करावा लागत असतांना तथाकथित हिंदुत्वनिष्ठ पक्ष इस्लामिक बँकिंगसाठी प्रयत्न करत आहेे.
इस्लामिक बँकिग सेवा 
आरंभ करणार्‍या मंत्र्यावर टीका 
        पूजा पांडे यांनी महाराष्ट्रातील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही टीका केली. त्या म्हणाल्या की, सुभाष देशमुख यांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या सोलापूरमधील लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेत इस्लामिक बँकिंग सेवा चालू केली. या सेवेच्या माध्यमातून व्याजरहित ठेवी स्वीकारल्या जातात.
        तसेच हा पैसा शून्य टक्के व्याजाने अल्पसंख्यांकांना दिला जातो. यावरून मोदी यांनी आता हिंदुत्वाचा मुखवटा उतरवला आहे, अशी टीका पांडे यांनी केली.
सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्‍नचिन्ह !
        पंतप्रधान मोदी खोट्या सर्जिकल स्ट्राइकसाठी लोकांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपदेखील महासभेच्या सदस्यांनी केला आहे. हिंदु महासभेचे उत्तर प्रदेश प्रवक्ते अशोककुमार पांडे यांनी म्हटले की, सीमावर्ती भागातील आतंकवादी कारवाया वाढत आहेत. प्रतिदिन सैनिक हुतात्मा होत आहेत. जर खरोखरच सर्जिकल स्ट्राइक झाला असेल, तर त्याचा परिणाम का दिसत नाही ? अशोककुमार पांडे पुढे म्हणाले की, मोदी यांचे ब्रँडिंग करून त्यांची भक्तमंडळी लोकांच्या मनात त्यांच्याविषयी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना विरोध केल्यास देशविरोधी असल्याचा शिक्का मारला जात आहे. सामान्य माणसाला नोटाबंदीच्या निर्णयामुळे प्रचंड त्रास होतो आहे; मात्र त्याच्याकडे त्रास सहन करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn