Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातनच्या सात्त्विक उत्पादनांना समाजातून अभूतपूर्व प्रतिसाद

नोव्हेंबर २०१६ मधील सनातन संस्थेचे पुणे जिल्ह्यातील प्रसारकार्य

१. सनातनच्या उत्पादनांचे वितरण करणारे पुणे जिल्ह्यातील धर्माभिमानी व्यावसायिक !
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
१ अ. चांगल्या व्यावसायिकांशी संपर्क करून देण्याची सिद्धता दर्शवणारे श्री. दीपक डुबाले ! : ‘सिंहगड रस्ता येथील पतंजली उत्पादनांचे मुख्य वितरक श्री. दीपक डुबाले यांनी राष्ट्र-धर्माच्या कार्यात सहभाग म्हणून काही दुकानदारांचे संपर्क क्रमांक दिले. त्यांच्याकडे ४०० दुकानदारांची सूची आहे. त्यांच्यापैकी चांगल्या व्यावसायिकांशी संपर्क करून देण्यासाठी त्यांनी सिद्धता दर्शवली.
१ आ. प्रथम भेटीतच नेलेली सर्व उत्पादने विकत घेऊन त्यांचे वितरण करणारे श्री. सुरके : ‘उत्पादनांचे वितरण व्यावसायिक स्तरावर कसे होईल’, यासाठी प्रयत्न करत असतांना दुकानदार श्री. सुरके यांना संपर्क केल्यावर ते प्रथम भेटीतच मला म्हणाले, ‘‘मला सनातनचे कार्य ठाऊक आहे.’’ नेलेली सर्व उत्पादने त्यांनी रोख रक्कम देऊन घेतली. सध्या त्यांनी व्यवसाय पालटला असून दुकान बंद करेपर्यंत ते संस्थेची उत्पादने वितरण करत होते.
१ इ. सनातनची सर्व उत्पादने वितरण करायची सिद्धता असणारे बाणेर येथील ‘धन्वंतरी आयुर्वेद अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स’चे श्री. मुकेश उपाध्याय ! : बाणेर येथील ‘धन्वंतरी आयुर्वेद अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स’चे श्री. मुकेश उपाध्याय म्हणाले, ‘‘मला सनातनची सर्व उत्पादने वितरण करायची असून ती सर्व घेऊन या.’’ श्री. मुकेश यांनी हिंदी सनातन पंचांगची मागणी करून वितरण केले आणि ते पाक्षिक हिंदी सनातन प्रभातचे वर्गणीदारही झाले.
१ ई. सनातनची उत्पादने घेणारे दुकानाशी जोडले जाण्याची अनुभूती घेणारे ‘शिवकृपा आयुर्वेद’चे श्री. विशाल रायकर : सनसिटी येथील ‘शिवकृपा आयुर्वेद’चे श्री. विशाल रायकर यांच्याकडे सात्त्विक उत्पादने ठेवण्यासंदर्भात २ - ३ वेळा जाणे झाले. वृत्तपत्रांतील सनातनविरोधी लिखाण अन् वाहिन्यांवर सनातनविरोधी बोलले जाणे, यांसंदर्भात त्यांना असलेल्या शंकांचे निरसन झाल्यावर त्यांनी उत्पादनांची मागणी दिली. ते प्रतिमास ठराविक रकमेची सात्त्विक उत्पादने वितरण करतात. त्यांनी सांगितले, ‘‘सनातनची उत्पादने ठेवल्याने ती घेण्यासाठी येणारेही दुकानाशी जोडले जातात, असा माझ्या परिचयातील व्यक्तींचा अनुभव होता. माझाही तोच अनुभव आहे.’’
   श्री. विशाल रायकर यांच्याशी चर्चा चालू असतांना सनातनचे एक विज्ञापनदाते त्या दुकानात खरेदी करत होते. ‘येथे सनातनची उत्पादने आहेत’, हे लक्षात आल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला. एकदा दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले, ‘सनातनचे उटणे विक्रीसाठी ठेवा. ते चांगले आहे.’ सनातनच्या प्रदर्शनावर नियमित उत्पादने घेणार्‍या एका महिलेने श्री. विशाल यांना सांगितले, ‘‘मी नियमितपणे ९०० ते १ सहस्र रुपयांची सनातनची उत्पादने घेते. तुम्ही तुमच्या दुकानात सनातनची उत्पादने ठेवल्यास आम्ही येथून घेऊन जाऊ.’’
१ उ. सेवा म्हणून उत्पादने ठेवणारे धायरी येथील ‘सश्रीक एजन्सी’चे श्री. काळे : धायरी येथील ‘सश्रीक एजन्सी’चे श्री. काळे यांना भेटल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘आमची सेवा म्हणून आम्ही उत्पादने ठेवू.’’ त्यानुसार त्यांच्या दुकानात सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण होते. त्यांनी सनातन पंचांगही वितरणासाठी घेतले आहे. सौ. काळे नामजप करतात.
१ ऊ. ‘सनातनचे कार्य आवडते’, असे सांगणारे ‘अभिषेक एंटरप्रायजेस’चे श्री. श्रीरंग जोशी आणि सौ. शुभदा जोशी : सध्या किरकटवाडी येथे रहाणारे श्री. आणि सौ. जोशी पूर्वी वारजे येथे रहात होते. सौ. शुभदा जोशी ६ - ७ वर्षे सनातनची उत्पादने वापरत होत्या आणि नामजपही करत होत्या. किरकटवाडी येथे रहायला गेल्यानंतर त्यांचा सनातन संस्थेशी संपर्क राहिला नाही. त्यांच्या दुकानात सनातनची उत्पादने ठेवण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी विक्रीसाठी उत्पादने घेतली. ‘‘आम्ही ६ वर्षांपासून सनातनचे अनुयायी आहोत. आम्हाला ते आवडते’’, असे सौ. जोशी म्हणाल्या. 
१ ए. सनातनच्या उत्पादनांचे नियमितपणे वितरण करणारे आणि परिचयाच्या व्यक्तींनाही ही उत्पादने घेण्यास प्रेरित करणारे ‘अरिहंत एजन्सी’चे श्री. आनंद सुराणा : सनसिटी रस्ता येथील ‘अरिहंत एजन्सी’चे श्री. आनंद सुराणा हे गेल्या ६ मासांपासून नियमितपणे सनातनची उत्पादने मागवून त्यांचे वितरण करतात. त्यांनी ‘पतंजली आणि आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थांची उत्पादने वितरण करणार्‍या दोघांचे संपर्क क्रमांक दिले. त्यांपैकी एका ठिकाणी त्यांनी वितरण करण्यासाठी प्रयत्नही केला. एक व्यक्ती अनाथाश्रमात ‘दिवाळी भेट’ म्हणून काही उत्पादने देणार होती. त्यांनी सनातनचे उटणे द्यावे, यासाठी आनंद सुराणा यांनी प्रयत्न केले आणि उटण्याचे वितरणही केले. 
१ ऐ. सनातनची उत्पादने अधिकाधिक वितरीत होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे श्री. रोहित नारखेडे : श्री. रोहित नारखेडे आर्ट ऑफ लिव्हिंगची, तसेच अन्य स्वदेशी उत्पादने पेठेत मोठ्या प्रमाणात वितरीत व्हावीत, यासाठी प्रयत्न करतात. भारतीय ग्राहकांना भारतीय उत्पादने, तसेच रसायनविरहित कच्च्या मालापासून उत्पादन केलेली आणि अत्यल्प प्रमाणात रसायन वापरून बनवली जाणारी उत्पादने मिळण्यासाठीही ते प्रयत्नरत आहेत. श्री. रोहित नारखेडे हे गेली ८ वर्षे माहितीजालाच्या (ई-मेलच्या) माध्यमातून सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. 
   ते स्वत: काही वस्तूंचे घाऊक वितरक असल्याने त्यांनी प्रथम सनातनची काही सात्त्विक उत्पादने विकत घेतली. त्यांच्या परिचयातील वितरकांना ती वापरायला दिली आणि त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आल्यावर आम्हाला त्यांना संपर्क करण्यास सांगितले. अशा प्रकारे त्यांनी बाणेर येथील श्री. चिंतन शहा, निगडी येथील श्री. रविकांत कुलकर्णी आणि कोथरूड येथील ‘सत्त्वमार्ट’ यांचे संपर्क क्रमांक देऊन अधिकाधिक उत्पादने वितरीत करण्यासाठी सहकार्य केले. हे सर्वजण सनातनची उत्पादने नियमितपणे वितरीत करतात आणि सनातन संस्थेला सहकार्यही करतात. श्री. रोहित नारखेडे हे स्वत: आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून साधना करतात. त्यांनी ‘स्वदेशी उत्पादने सर्वत्र पोचावीत’, या प्रेरणेने नोकरी सोडून स्वदेशी आणि रसायनविरहित उत्पादनांचे वितरण चालू केले आहे. त्यांचा याविषयीचा पुष्कळ अभ्यास आहे. त्यांचा सनातनवर स्नेह आहे. त्यांनी ‘सनातनची उत्पादने चांगली आहेत’, असे दुसर्‍या भेटीतच सांगितले. ‘सनातनची उत्पादने सर्वत्र पोचावीत’, अशी त्यांची तळमळ आहेे. ते ज्या व्यक्तींंना संपर्क करतात, त्यांच्यापैकी अनेक जण त्यांना सांगतात, ‘‘अन्य काहीही ठेवा; पण सनातनची पूजेसाठीची उत्पादने अवश्य ठेवा.’’ 
१ ओ. सनातन-निर्मित कुंकू आवडल्याने सनातनची सर्व उत्पादने विक्रीला ठेवणारे बाणेर येथील ‘नॅचरल फूड्स अ‍ॅण्ड वेलनेस’चे श्री. चिंतन शहा ! : बाणेर येथील ‘नॅचरल फूडस अ‍ॅण्ड वेलनेस’चे श्री. चिंतन शहा यांना पूर्वी श्री. रोहित नारखेडे यांनी सनातन-निर्मित कुंकू दिले होते. कुंकू आवडल्याने त्यांनी सनातनची सर्व उत्पादने विक्रीला ठेवणार असल्याचे सांगितले आणि त्याप्रमाणे मागणी दिली. श्री. चिंतन शहा हे गायत्री परिवाराच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. ते पाक्षिक हिंदी सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले. काश्मिरी हिंदूंसाठी आयोजित सभेसाठी त्यांनी त्यांच्या परिचयातील व्यक्तींना निरोप दिला. त्यांच्यापैकी काही काश्मिरी हिंदू आहेत. त्यांनी निरोप दिलेल्यांपैकी काही जण सभेला उपस्थित होते. 
१ औ. सनातनची उत्पादने वितरण करण्यासमवेतच समाजात त्यांचा प्रसार करणारे निगडी येथील ‘श्री सद्गुरु एंटरप्रायजेस’चे श्री. रविकांत कुलकर्णी : श्री. रोहित नारखेडे यांनी निगडी येथील ‘श्री सद्गुरु एंटरप्रायजेस’चे श्री. रविकांत कुलकर्णी यांचा संपर्क क्रमांक दिला होता. श्री. रविकांत कुलकर्णी हे १ वर्षापासून सनातनची उत्पादने आणि सनातनचा भीमसेनी कापूर यांचा शोध घेत होते. त्यांची भेट घेण्यास गेल्यावर त्यांनी वेळ देऊन सनातनच्या प्रत्येक उत्पादनाविषयी सविस्तर जाणून घेतले. त्यांनी भीमसेनी कापरासमवेत सनातनची इतर उत्पादने वितरण करण्यासह त्यांचा समाजात प्रसार करण्याची सिद्धता दर्शवली. त्याप्रमाणे त्यांचे नियमित प्रयत्न चालू झाले आहेत. 
श्री. कुलकर्णी हे विविध ‘व्हॉट्स अ‍ॅप’ गटांमध्ये सनातनच्या उत्पादनांचा प्रसार करतात. त्यांनी सनातनची उत्पादने स्वतःच्या दुकानात वितरणासाठी घेतली आहेत. ते सनातन पंचांग आणि सनातन प्रकाशित ग्रंथ वितरणास सिद्ध असतात. ते त्यांच्या ग्राहकांना सनातन-निर्मित वस्तू घेण्यासाठी प्रोत्साहित करतात.
श्री. आणि सौ. कुलकर्णी हे दोघेही नामजप करतात. ते पूर्वी प्रतिवर्षी घरी बालदीतील पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करत असत. वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे महत्त्व कळल्यानंतर त्यांनी त्यानुसार विसर्जन केले. 
२. सनातनची सात्त्विक उत्पादने आवर्जून वापरणारे आणि इतरांनाही देणारे वाचक अन् हितचिंतक
२ अ. नवरात्रीत ‘वाण’ म्हणून सनातनचे कुंकू देणार्‍या सौ. मुक्ता दांगट : सनातन प्रभातच्या वाचक सौ. मुक्ता दांगट यांना कुंकू लावण्याचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या बहिणीला त्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी नवरात्रीत सनातनचे कुंकू आणि मेण यांच्या डब्या ‘वाण’ म्हणून महिलांना दिल्या.
२ आ. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रूपाली चाकणकर या नियमितपणे सात्त्विक उत्पादने घेतात. त्या म्हणाल्या, ‘‘सनातनची उत्पादने चांगली आहेत.’’
२ इ. समाजातील एका महिलेला अष्टगंध पुष्कळ आवडते. त्या प्रत्येक मासाला अष्टगंधाच्या १२ डब्या घेतात. त्या अन्य व्यक्तींना अष्टगंध देतांना त्याचे महत्त्व सांगून देतात.
- सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, प्रसारसेवक, सनातन संस्था (क्रमश:) 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn