Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सतत दिव्य प्रवास करणार्‍या सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्राचे सर्व नैसर्गिक आपत्तींपासून आणि परकीय आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळावा, धर्माचे तसेच साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम आणि संशोधन केंद्रे इत्यादींना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत. अशा प्रकारे त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, तसेच महर्षि सांगत असलेल्या दैवी प्रवासाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी प्रतिदिन हे सदर चालू करत आहोत.’
९ ते १३ डिसेंबर २०१६ 
     परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गेल्या अनेक दिवसांपासून असलेला थकवा दूर होऊन त्यांचे आरोग्य ठीक रहाण्यासाठी महर्षींनी सांगितलेला उपाय ! : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गेले अनेक दिवस पुष्कळ थकवा आहे. त्यांची प्राणशक्ती न्यून झाल्यामुळे त्यांना १० मिनिटे बसताही येत नाही. त्यामुळे त्यांना झोपून रहावे लागत आहे. त्यांना होत असलेल्या या त्रासावर महर्षींनी सांगितलेला उपाय केला.’ - (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn