Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची चिनी मांजावर बंदी !

चीनच्या एकेका वस्तूंवर बंदी घालण्यापेक्षा राष्ट्राला हानीकारक सर्वच 
चिनी वस्तूंवर एकदाच बंदी का घालत नाही ? त्यामुळे देशाची हानी तरी टळेल !
     नवी देहली - काचेची पूड लावलेल्या चिनी मांजावर बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिला आहे. ही बंदी काचेची पूड असलेल्या नायलॉन, चिनी आणि सुती अशा सर्व प्रकारच्या मांजांवर लागू असेल, असेही न्यायाधिकरणाचे अध्यक्ष स्वतंत्र कुमार यांच्या खंडपिठाने स्पष्ट केले आहे. याबरोबरच या मांजाच्या परिणामांविषयी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर करण्याचा आदेशही न्यायाधिकरणाने ‘मांजा असोसिएशन ऑफ इंडिया’ला दिला आहे.
    या मांजामुळे आतापर्यंत मनुष्यासह प्राणी आणि पक्षी यांची प्राणहानी झाल्याच्या अनेक घटना निदर्शनास आल्या होत्या, तसेच मकर संक्रांत जवळ येऊ घातली आहे. या सणाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मांजाचा वापर केला जातो. या पार्श्‍वभूमीवर ‘पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स’ (पेटा) या संस्थेने अधिवक्ता संजय हेगडे आणि शदान फरासत यांच्यावतीने एक याचिका प्रविष्ट केली होती. या वेळी हा मांजा पर्यावरणासाठी धोकादायक असल्याचे न्यायाधिकरणाने निकालात नमूद केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने वर्ष २०१५मध्ये उत्तरप्रदेशात चिनी मांजावर बंदी घातली होती, तसेच संपूर्ण देशभर या मांजाचे उत्पादन, विक्री आणि वितरण यांवर बंदी घातली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn