Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या निमित्ताने साधना करण्याचे आणि श्रीगुरूंचे आज्ञापालन करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !

श्री. अभय वर्तक
      २५ ते २७ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत रामनाथी आश्रमात वक्ता प्रशिक्षण शिबीर झाले. या शिबिरात लिबिया, सिरीया, कझाकीस्तान, इस्रायल, इंग्लंड आदी देशांचा उल्लेख होत होता. ही नावे ऐकल्यावर माझे मन अस्वस्थ होत असे. याउलट शिबिरातील मधल्या विश्रांतीच्या सत्रात केवळ एकदा श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज किंवा परात्पर गुरु डॉ. आठवले यांपैकी कोणतेही नाव घेतल्यावर मन स्थिर होत असे. यावरून देवाने त्यांचेे स्मरण करण्याचे महत्त्व लक्षात आणून दिले आणि पुढील तुलनात्मक सारणी सुचवली.
      या सारणीतून क्रांतीकारक आणि भक्त यांतील भेद लक्षात आला. सनातनच्या साधकांना हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापण्यासाठी अवताराचे भक्त बनायचे आहे. स्वतःचे मन आणि बुद्धी यांच्या आधारे वागणारे किती अशांत असतील, हे मला वरील प्रयोगातून काही क्षणांत अनुभवता आले. आपण साधना करत असल्यास श्रीगुरु करवून घेणारच आहेत, या धारणेमुळे मन प्रसन्न आणि समाधानी रहाते. मलाच सर्व करायचे आहे, हा विचार किती दुःखदायी आहे, याचा अनुभव देवाने या निमित्ताने मला दिला. श्रीगुरूंची आज्ञा म्हणून इतिहासाचा अभ्यास करणे आणि मी अभ्यास करून इतरांना सांगीन, मी क्रांतीकारक होईन, यांतील भेद केवळ गुरुकृपेमुळे अनुभवता आला. यासाठी श्रीगुरुचरणी कृतज्ञता !
- श्री. अभय वर्तक, देहली (२७.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn