Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

सौ. नंदिनी साळोखे
गुरुमाऊलीच साधकांना घेऊन जाणार मोक्षासी ।
गुरुमाऊलीच्या नामाने
कंठ दाटूनी येई ।
गुरुमाऊलीच्या स्मरणाने
देहाचे भान विसरूनी जाई ॥ १ ॥
गुरुमाऊली समवेतचा आनंद
प्रत्येक क्षणी अनुभवता यावा ।
गुरुमाऊलीच्या स्मरणात
हा जन्मही अपुरा पडावा ॥ २ ॥
गुरुमाऊलीच्या मुखातून निघालेला शब्द
आजही माझ्या कानी फिरतो ।
गुरुमाऊलीची आठवण मला साधनेत उभारी देते ॥ ३ ॥
गुरुमाऊलीचे हास्य आठवता हृदय माझे भरून येते ।
गुरुमाऊलीचे प्रसंग आठवता शब्दांशब्दांची साठवण होते ॥ ४ ॥
गुरुमाऊली असे आमच्या साधकांचे सर्वस्व ।
गुरुमाऊलीच्या साधकांवर असे
देवदेवता नि महर्षि यांचे आशीर्वाद ॥ ५ ॥
गुरुमाऊलीने साधक घडवण्यासाठी घेतले अपार कष्ट ।
साधकांची उन्नती करून आणणार हिंदु राष्ट्र ॥ ६ ॥
माझे साधक असे म्हणता न थकणारी माझी गुरुमाऊली ।
आम्हा साधकांवर असे प्रेमाची मायेची सावली ॥ ७ ॥
साधनेतील खाच-खळग्यातून उचलून दावी वाट साधनेची ।
गुरुमाऊलीच साधकांना घेऊन जाणार मोक्षासी ॥ ८ ॥
    पण माझ्या गुरुमाऊलीसाठी मी काहीच करू शकत नाही !
- सौ. नंदिनी (जया) साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn