Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ !

केंद्र सरकार आणि राज्यातील पीडीपी-भाजप सरकार यांच्या 
 निष्क्रीयतेचा परिणाम ! काँग्रेस सरकारच्या काळापेक्षाही जर 
काश्मीरची  परिस्थिती अधिक बिघडत असेल, तर त्याचे दायित्व सरकारचेच आहे ! 
     नवी देहली - जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आतंकवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर केलेल्या आक्रमणांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या ४ वर्षांत ही वाढ झाली आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर दिली. (नुसती मार खाण्याची आकडेवारी देणारे मंत्री काय कामाचे ? या घटना कशा रोखणार, हे का सांगत नाहीत ? - संपादक) बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये चालू झालेल्या हिंसाचारानंतरच अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. 

१. वर्ष २०१३ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाच्या संदर्भात १७० घटना घडल्या होत्या. वर्ष २०१४ मध्ये हा आकडा २२२ वर पोचला. 
२. वर्ष २०१५ मध्ये ३९ सैनिक हुतात्मा आणि १०३ सैनिक घायाळ झाले होते; मात्र नोव्हेंबर २०१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार ७१ सैनिक हुतात्मा झाले आहेत, तर २०८ सैनिक घायाळ झाले आहेत. 
३. स्थानिक लोकांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र अल्प झाले आहे. गेल्या वर्षी १७ जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी १४ जणांनी जीव गमावला आहे. 
४. २७ नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार सैनिकांनी १४० आतंकवाद्यांना ठार केले आहे. २०१५ मध्ये हा आकडा ४६ होता. घायाळ आतंकवाद्यांच्या आकडेवारीत ७ पटींनी वाढ झाली आहे. ही संख्या १० वरून ७६ वर पोचली आहे. 
५. यावर्षी ४३७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. गतवर्षी ही संख्या ४०५ होती. ४३७ पैकी २२१ वेळा आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर, तर २१६ वेळा नियंत्रणरेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. 
६. शस्त्रसंधी उल्लंघनात एकूण १२ स्थानिकांचा मृत्यू झाला असून ८० घायाळ झाले. १११ घरांची यामध्ये हानी झाली. शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एकूण ८ सैनिक हुतात्मा झाले, तर तर ७४ घायाळ झाले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn