Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! - शिराळा आणि पलूस येथे निवेदन

(उजवीकडे) आमदार श्री. शिवाजीराव नाईक यांना दैनिक सनातन प्रभात भेट देतांना हिंदुत्वनिष्ठ

(डावीकडे) शिराळा पोलीस निरीक्षक श्री. प्रताप पोमण यांना यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
   सांगली - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखावेत यांसाठी शिराळा येथे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप पोमण यांना आणि तहसीलदार श्री. दिपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु धर्माभिमानी श्री. शशांक चव्हाण आणि श्री. अशोक मस्कर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष कुंभार, तसेच सनातन संस्थेचे श्री. रामाराम मोरे उपस्थित होते. हेच निवेदन शिराळा येथील आमदार श्री. शिवाजीराव नाईक यांनाही देण्यात आले. याचप्रकारे पलूस येथेही तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. आमदार श्री. शिवाजीराव नाईक यांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात 
आलेला दैनिक सनातन प्रभातचा विशेषांक भेट देण्यात आला. 


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn