Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जळगाव येथे पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण !


      जळगाव, २० डिसेंबर (वार्ता.) - हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त विविध उपक्रमांद्वारे, तसेच पथनाट्य, सामाजिक संकेतस्थळे, होर्डिंग, भित्तीपत्रके, स्टिकर यांद्वारे विविध आस्थापने, संस्था, महाविद्यालये, संघटना आणि घरोघरी प्रसार करण्यात येत आहे. सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून सभेच्या प्रचारासंदर्भातील समितीच्या जळगाव फेसबूक पेजची एकूण रीच संख्या एका सप्ताहात ३ लाखांहून अधिक झालेली आहे. तसेच व्हॉट्स अ‍ॅपद्वारे सभेचा विषय ६५ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोचला आहे.
पथनाट्य सादर करतांना कार्यकर्ते
      शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ पथनाट्य आणि मार्गदर्शन यांद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. एकतर्फी प्रेमप्रकरणात मुलींवर होणारे अत्याचार आणि महिलांचे सक्षमीकरण या विषयावर पथनाट्यातून नाटिका सादर करण्यात आली. तसेच ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण, वाहन परवाना काढतांना आर्.टी.ओ.मध्ये होणारा भ्रष्टाचार या विषयांवरही पथनाट्याद्वारे एकच व्यक्तीरेषा योग्य आणि अयोग्य भूमिकेत दाखवून योग्य वर्तणुुकीची धमक युवा पिढीत निर्माण होण्यासाठी हिंदु धर्मजागृती सभेला येण्याचे आवाहन करण्यात आले.
      यानंतर समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, भ्रष्ट आणि अन्यायी समाजव्यवस्थेच्या विरुद्ध युवकांनी आवाज उठवणे आवश्यक आहे. तसेच केवळ स्वार्थी विचार न ठेवता समाजाभिमुख उपक्रमांत सहभागी व्हायला हवे. सक्षम आणि चारित्र्यवान युवा पिढीच राष्ट्र घडवू शकते. यासाठी ‘युवतींनीही स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यायला हवे’, असे ते म्हणाले. यानंतर प्राचार्यांना ३१ डिसेंबरनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्याविषयीचे निवेदन देण्यात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn