Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शेतकर्‍यांना हरितक्रांतीच्या चक्रव्यूहात फसवले गेले आहे !

‘झिरो बजेट’ शेतीचे प्रणेते कृषीऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे परखड मत
      कणकवली - रासायनिक आणि सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून सरकार आणि कृषी विद्यापिठे यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली. विद्यापिठे तर रासायनिक शेतीचे प्रयोग करण्यास सांगून शेतकर्‍यांना लुटत आहेत. अशा प्रयोगामुळे सावकारी पद्धतीची यंत्रणा विकसित केली गेली आहे. हे नवीन चक्रव्यूह निर्माण केले गेले असून त्याचे गोंडस नाव ‘हरितक्रांती’ आहे. आपल्याकडे हरितक्रांती कधी झाली नाही आणि होणारही नाही. त्यामुळे विद्यापिठांनी शेतकर्‍यांची फसवणूक थांबवावी आणि शेतकर्‍यांनीही स्वतःच्या प्रगतीसाठी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’कडे वळावे, असे आवाहन ‘झिरो बजेट’ शेतीचे प्रणेते कृषीऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केले. पद्मश्री पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथे पाच दिवसीय झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी पाळेकर म्हणाले....
१. शेतकरी भिकारी नाही. त्याला साहाय्य करण्यापेक्षा त्याला नैसर्गिकरित्या शेती करण्यासाठी पाठबळ द्या.
२. सेंद्रीय शेतीसुद्धा भयावह आहे; म्हणून नैसर्गिक शेती हवी आहे. 
३. शेतीशी निगडित सर्व समस्या मानवनिर्मित आहेत. ग्लोबल वॉर्मिंग, तापमान बदल, अन्नधान्य सुरक्षा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या या सगळ्यांशी आपलाही थेट संबंध आहे.
४. शेतकरी प्रत्यक्ष आत्महत्या करतो आणि आपण कॅन्सर, मधुमेहाच्या आजाराने प्रतिदिन आत्महत्या करत असतो. याला उपाय म्हणजे नैसर्गिक शेती.
५. रासायनिक शेतीने प्रत्येक उत्पादन घटत आहे. यावर उपाय ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’च आहे. आज देशात ५० लाख शेतकरी अशी शेती करत आहेत; पण कृषी विद्यापिठे हे मान्य करायला सिद्ध नाहीत.
(संकेतस्थळ वृत्त)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn