Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

...अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना सनबर्न फेस्टिव्हल बंद पाडतील !

श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांची हिंदुत्वनिष्ठांनी
भेट घेतली त्या वेळी त्यांना निवेदन सादर करतांना हिंदुत्वनिष्ठ
शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची खणखणीत चेतावणी
केसनंद (जिल्हा पुणे) येथे होणार्‍या सनबर्न या पाश्‍चात्त्य संगीत महोत्सवाला होणार्‍या विरोधाची धार तीव्र !
     पुणे, १९ डिसेंबर (वार्ता.) - मादक पदार्थांच्या सेवनाला प्रोत्साहन देणार्‍या आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार्‍या सनबर्न फेस्टिव्हलला अनुमती देण्यात येऊ नये अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना सनबर्न फेस्टिव्हल बंद पाडतील, अशी खणखणीत चेतावणी शिवसेनेचे खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे. खासदार श्री. पाटील यांनी तसे पत्रही जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांना दिले आहे. १८ डिसेंबर या दिवशी सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी श्री. पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी याची नोंद घेत तत्परतेने पोलीस आणि प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार केला. पाश्‍चात्त्य संगीताच्या नावाखाली अमली पदार्थांचा अड्डा निर्माण करणार्‍या सनबर्न या पाश्‍चात्त्य संगीत महोत्सवाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. या कार्यक्रमाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह आता शिवसेनेनेही आंदोलन छेडले आहे. हे निवेदन देतांना बजरंग दलाचे सर्वश्री उमेश कंधारे, संदेश काळे, कैलास गुंजाळ, शिवसेनेचे रमेश तोत्रे, रवींद्र तोत्रे आणि हिंदु जनजागृती समितीचे अभिजीत देशमुख, दिलीप शेटे, गणेश नवले आणि विशाल टाव्हरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन झाले, तर कायदा-सुव्यवस्था यांचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुणे जिल्ह्यात कुठेच या कार्यक्रमाला अनुमती देण्यात येऊ नये, असे श्री. पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
खासदार श्री. अनिल शिरोळे (डावीकडे) यांना निवेदन
देताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे
पंतप्रधानांना पत्र लिहू ! - भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांचे आश्‍वासन
     भाजपचे खासदार श्री. अनिल शिरोळे यांनाही हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी सनबर्नच्या विरोधात निवेदन दिले. त्यांनीही या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचे आश्‍वासन दिले.
शिवसेना स्थानिक स्तरावरही विरोध करणार !
     शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. रामशेठ गावडे, तसेच शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख श्री. राजेंद्र पायगुडे यांनीही संपूर्ण ताकदीनिशी सनबर्नला विरोध करू, असेे सांगितले आहे. शिवसेनेचे पुणे जिल्हा उपप्रमुख श्री. अनिल काशीद आणि शिरुर तालुकाप्रमुख श्री. पोपटराव शेलार यांनीही कार्यक्रमाच्या विरोधात आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn