Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नववर्ष १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करा ! - हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची संस्कृती रक्षण मोहीम !
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्माभिमानी यांचा मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग !

पुणे, २३ डिसेंबर (वार्ता.) - ख्रिस्ती नववर्ष स्वागताच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणारे समाज आणि संस्कृतीविघातक प्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संस्कृतीरक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून या वर्षीही समितीच्या वतीने पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळा आणि महाविद्यालये यांंमधील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी, तसेच ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांना, तसेच पोलीस-प्रशासन विभागातील अधिकार्‍यांना निवेदने देण्यात आली. विद्यार्थ्यांचे व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधनही करण्यात आले. या मोहिमेला शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी अन् शिक्षक यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक शिक्षकांनी समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
आर्.एम्.डी.चे सिंहगड स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे
 प्राचार्य डॉ. सी.बी. बंगाल (उजवीकडून तिसरे)

इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.डी. बाळसराफ (उजवीकडे)

कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील (उजवीकडे)

बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य एम्.जी. चासकर (उजवीकडे)

श्रीमती बकुल तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग 
एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. मीना गणपती (उजवीकडे)

व्याख्यान ऐकतांना श्रीमती बकुल तांबट इन्स्टिट्यूट
ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या विद्यार्थिनी
१. कोथरूड येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ‘कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’चे उपप्राचार्य डॉ. व्ही.व्ही. तोडकर यांना निवेदन देण्यात आले. ‘सनातनचे कार्य अमूल्य आहे. प्रत्येक महाविद्यालयात याविषयीचे प्रबोधन आवश्यक आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यांनी स्वतःहून श्रीमती बकुल तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. मीना गणपती यांना भेटण्याविषयीही सुचवले. डॉ. मीना गणपती यांना भेटायला गेल्यावर त्यांनी संपूर्ण शिक्षक कर्मचार्‍यांसमवेत विषय ऐकून घेतला आणि निवेदनही स्वीकारले, तसेच विद्यार्थिनींसाठी समितीच्या कार्यकर्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजनही केले. २०० हून अधिक विद्यार्थिनींनी त्याचा लाभ घेतला. 
२. वारजे भागातील आर्.एम्.डी.चे सिंहगड स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. सी.बी. बंगाल यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना विश्‍व हिंदु परिषदेचे मोहन ठेकेदार, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
३. सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य एम्.जी. चासकर, बाबुरावजी घोलप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.एम्. जाधव, नवी सांगवी येथील नवी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माळवदे, नर्‍हेगाव येथील जेएस्पीएम् एन्.टी.सी.चे प्राचार्य डॉ. डी.एस्. बोरमाने, भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. डी.एन्. बिलगी, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य एस्.एन्. माळी, झील महाविद्यालयाचे श्री. संजय देवकर, काका चव्हाण महाविद्यालयाचे श्री. खाडे, पी. जोग. शाळा आणि महाविद्यालयाचे श्री. पवार यांना समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली. 
४. नर्‍हेगाव येथील सी.वाय्.डी.पी. शिक्षण आणि क्रीडा मंडळाचे ‘इन्स्टिट्यूूट ऑफ नर्सिंग’चे श्री. हनुमंत लहाने यांनी निवेदन दिल्यावर विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर व्याख्यानाचेही आयोजन केले. या वेळी ५८ विद्यार्थी उपस्थित होते. 
५. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.डी. बाळसराफ आणि रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या प्रतिभा चौधरी, नवीन समर्थ शाळेच्या श्रीमती सुचेता सातारफोड आणि महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. शैलेंद्र मोरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. प्रभाकर जगताप आणि हितचिंतक श्री. रंगनाथ उंडे स्वतःहून सहभागी झाले होते. (संस्कृतीरक्षण मोहिमेत सहभागी होऊन धर्मरक्षणासाठी कृतीशील झालेल्या ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचे अभिनंदन ! अन्यत्रचे नागरिकही धर्मरक्षणासाठी कृतीशील झाले, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा दिवस दूर नाही. - संपादक) 
६. टिळक रस्ता येथील महाराष्ट्र विद्यार्थी साहाय्यक मंडळाचे अशोक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजानन केसकर यांनी प्रबोधनपर व्याख्यान दिले. या वेळी २५० हून अधिक विद्यार्थी आणि १८ शिक्षक उपस्थित होते. सरस्वती अभ्यासिका आणि सावली अभ्यासिकेतही अनुक्रमे ६८ आणि ३६ जणांनी गुढीपाडव्याचे शास्त्र आणि संस्कृतीरक्षण मोहिम यांविषयी जाणून घेतले. 
७. ३१ डिसेंबरच्या दिवशी प्रेक्षणीय स्थळे, किल्ले अशा सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवावेत, यासाठी कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देतांना वृक्ष संवर्धन समितीचे सर्वश्री जयदीप पडवळ, शिवसेनेचे कोथरूड उपविभागप्रमुख शिवाजीराव गाढवे, शाखा प्रमुख नारायण पाटील, विवेकानंद विचार प्रसारक समितीचे दामोदर रामदासी आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ, तसेच समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
-

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn