Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सौदी अरेबियात दीडशे भारतियांचे मृतदेह वर्षभरापासून तेथील शवागृहात पडून !

सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाचे भारतियांना साहाय्य 
होत नसेल, तर त्याच्यावर जनतेचे पैसे कशाला उधळायचे ?
भारतीय दूतावासाकडून अल्प प्रतिसाद !
      भाग्यनगर - नोकरीच्या निमित्ताने सौदी अरेबियात गेलेल्या दीडशे भारतियांचे मृतदेह वर्षभरापासून सौदीच्या शवागृहात पडून आहेत. हे मृतदेह कह्यात घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक प्रचंड धडपड करत आहेत. भारतीय दूतावासाकडून मात्र त्यांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. हे मृत्यू आजारपण, अपघात आणि आत्महत्या यांमुळे झाले आहे. त्यात बहुतांश तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील लोकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.
     भाग्यनगर (हैद्राबाद), करीमनगर, वारंगळ, महबूबनगर, निझामाबाद आदी भागांतून मोठ्या प्रमाणावर लोक आखाती देशात नोकरीसाठी जातात. केवळ सौदी अरबमध्ये आंध्र आणि तेलंगण या राज्यांमधील १० लाख लोक काम करत आहेत.
१. मुर्शिदाबादला रहाणारे महंमद ताहीर हे दमम येथे कॉम्प्युटर प्रोग्रामर आहेत. त्यांच्या मते, मृतदेहांना भारतात पाठवण्याची प्रक्रिया अत्यंत जटील आहे. याचवर्षी भाग्यनगरच्या असीमा नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी तेलंगण सचिवालयाने रियाधमधील भारतीय दुतावासाला पत्रही लिहिले. तरीही भारतीय दुतावासाला असीमाचे पार्थिव भारतात आणण्यात यश आले नाही; परंतु एका स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने असीमाचे पार्थिव भाग्यनगरला आणले. असे अनेक मृतदेह अनुमाने आठ-आठ महिन्यांपासून शवागृहात पडून आहेत. 
२. सौदीच्या नियमानुसार एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला असेल, तर त्याचा मृतदेह ४० दिवसानंतर त्याच्या देशात पाठवला जातो.
३. मृतदेह परत पाठवण्यासाठी ४ ते ६ लाख रुपये खर्च येतो. त्यासाठी भारतीय दुतावासाला किमान ४ पत्रे लिहावी लागतात. मृतदेह नेण्यासाठी वैद्यकीय आणि पोलीस अहवाल मिळवावा लागतो, तसेच सौदी सरकार किंवा नोकरी मिळवून देणार्‍याकडे हानी भरपाई मागितली जाणार नाही, असे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतरच मृतदेहाचा ताबा देण्यात येतो. त्यामुळेच सौदीतील शवागृहात मृतदेह खितपत पडून असतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn