Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अयोध्येतील राममंदिर !

संपादकीय
     अयोध्या येथे राममंदिराची उभारणी करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत केली. राममंदिराच्या सूत्रावर महाराष्ट्र राज्यातून किंवा राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचाच आवाज ऐकू येत असतो. केंद्रसरकामध्ये शिवसेना सहभागी आहे, तरीही या पक्षाला सरकारकडे एका महत्त्वाच्या सूत्रावर मागणी करावी लागते. लोकराज्य व्यवस्थेतील हा शिष्टाचार आहे, असे मानले जाते. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचे राष्ट्रीय सूत्रावर एकमत व्हावे, असा एक समज असल्याने जनताभिमुख अशा सूत्रांविषयी तळमळ असली, तरी व्यवस्था कशी अडचणीची ठरते, हे येथे लक्षात येते. काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष श्री. अमित शहा यांनी पत्रकारांना सांगितले होते की, राममंदिराचे सूत्र न्यायप्रविष्ट असल्यामुळे राममंदिराच्या उभारणीला उशीर होत आहे. राजकीय पक्षांच्या धोरणांतील हा किस्सा विलक्षण करमणूक करणारा आहे. वर्ष २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक झाली, तेव्हाच हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते आणि ‘भाजप सत्तेत आल्यावर अयोध्या येथे राममंदिर उभारेल’ असे आश्‍वासन भाजप जनतेला देत होता. भावभोळी जनता ‘राममंदिर उभे रहाणार’ या एकाच श्रद्धेमागे धावत होती. अद्याप राममंदिर उभारण्याच्या संदर्भात स्पष्ट संकेत जनतेपर्यंत पोेचलेले नाही. त्यामुळे हे सूत्र परत परत ऐरणीवर येत असते. भाजपचे नेते श्री. सुब्रह्मण्यम् स्वामी राममंदिरच्या संदर्भातील प्रकरण न्यायालयात जलदगतीने चालवले जावे, शासनाने त्यात पुढाकार घेऊन प्रकरण लवकर निकाली काढावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असतात. अर्थात् राममंदिर उभे रहाण्याची चिन्हे जवळपास असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. केंद्रशासनाने दोन वर्षांहून अधिक काळ सत्ता राबवली आहे. आता तेवढाच कालावधी बाकी आहे. मागील दोन वर्षांत राममंदिराविषयी काहीच सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही, तर आता उरलेल्या कालावधीत तरी शासन काय कृती करणार आहे ? असा प्रश्‍न जनतेच्या मनात उभा आहे. बाबरी उद्ध्वस्त झाली तेव्हाचा क्षण आठवल्यास डोळ्यांसमोर जो देखावा उभा रहातो, तो विलक्षण शौर्याचा दिसतो. हिंदुत्वनिष्ठांनी त्याचे कौतुक केले आणि विजयश्री खेचून आणल्याचा आनंद घेतला. कुणा शासकीय यंत्रणेचे पाठबळ नसतांना अथवा कुठल्या संघटनेचे नेतृत्व नसतांना ते घडले होते. आता राममंदिर उभारणीसाठी त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली आणि कुणी स्वबळावर राममंदिर उभारले, तर त्याचे कौतुक होण्यापलीकडे काय होणार ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn