Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

समाधानी, सर्वांना साहाय्य करणारा आणि साधनेची उपजत आवड असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वरंगळ, तेलंगणा येथील कु. अनुज मुकुंद जाखोटिया (वय १० वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु
राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अनुज जाखोटिया एक दैवी बालक आहे !
कु. अनुज जाखोटिया
      (कु. अनुज याची आध्यात्मिक पातळी वर्ष २०११ मध्ये ५३ टक्के होती.) 
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
    यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
१. देवाधर्माची आवड
     ‘देवाविषयीची कोणतीही कृती करायला तो सदैव सिद्ध असतो.
१ अ. देवपूजा करायला आवडणे : नित्यनेमाने देवपूजा करायला त्याला पुष्कळ आवडते. मध्यंतरी जवळजवळ ६ मास घरातील मुख्य देवपूजा तोच करत असे. रिकाम्या वेळेत तो देवतांच्या चित्रांकडे एकटक पहात बसतो आणि देवतांच्या शस्त्रांविषयी कुतुहलाने विचारणा करतो.
१ आ. धर्माचरणी : इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असूनही न चुकता कपाळाला टिळा लावूनच शाळेत जातो.
१ इ. स्तोत्रपठण करणे : प्रतिदिन दोन्ही वेळेला गणपतिस्तोत्र, मारुतिस्तोत्र, हनुमानचालिसा, रामरक्षा आणि गणपति अथर्वशीर्ष म्हणतो. गेल्या दीड वर्षापासून प.पू. पांडे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिदिन गणपति स्तोत्राचे पारायणही करतो.
१ ई. त्याला धार्मिक मालिका पहायला, तसेच धार्मिक गोष्टी ऐकायला पुष्कळ आवडते. 
२. अन्य गुणवैशिष्ट्ये
२ अ. समाधानी वृत्ती : इतर मुलांप्रमाणे नवीन कपडे किंवा खेळणी यांच्यासाठी तो कधीही हट्ट करत नाही. जे मिळेल त्यात तो पुष्कळ समाधानी असतो. वयाच्या तुलनेने तो पुष्कळ समजूतदार वाटतो. कोठेही बाहेर गेल्यास नातेवाईक किंवा इतर लोक त्याचे पुष्कळ कौतुक करतात.
२ आ. प्रेमभाव : त्याची वृत्ती इतरांना साहाय्य करण्याची असून तो पुष्कळ मायाळू आहेे. तो नेहमी मला (आईला) म्हणतो, ‘‘आई, तू थकली असशील. मी तुला साहाय्य करतो.’’ माझी छोटी-छोटी कामे तो न सांगताच करतो. त्याला सर्वांनाच साहाय्य करायला आवडते.
३. व्यष्टी आणि समष्टी साधना 
अ. तो प्रतिदिन १५ - २० मिनिटे बसून नामजप करतो. 
आ. महत्त्वाच्या कृती करतांना, म्हणजे आंघोळ करतांना, जेवतांना आणि शाळेत जातांना तो वेगवेगळ्या प्रार्थना करतो.
इ. तो आंघोळीच्या पाण्यात खडेमीठ आणि गोमूत्र अर्क टाकून आंघोळ करतो. 
ई. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी मार्गावर पडलेले कागदी अन् प्लॅस्टिकचे ध्वज घरी आणून तो विसर्जनाच्या पिशवीत टाकतो. याविषयी तो इतरांचे न चुकता प्रबोधनही करतो. एरवीही मार्गावर देवतांची चित्रे पडलेली दिसल्यास तो ती घरी आणतो. 
४. स्वभावदोष 
४ अ. राग येणे : काही वेळा मनाप्रमाणे न घडल्यास त्याला एकदम राग येतो. यावर तो कोणतेही प्रयत्न करत नाही. 
४ आ. चिडचिड करणे : सायंकाळी शाळेतून आल्यावर त्याची पुष्कळ चिडचिड होते.’ 
- सौ. स्वाती आणि श्री. मुकुंद जाखोटीया, वरंगळ, तेलंगणा. (२३.६.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn