Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अन्वेषणातील दिरंगाईमुळे उच्च न्यायालयाने सीबीआयला पुन्हा फटकारले !

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांचे प्रकरण
स्कॉटलंड यार्डकडून अन्वेषण अहवालास दिरंगाई होत असल्याने फॉरेन्सिक
तपासण्या देहलीतील प्रयोगशाळेत करण्याची सीबीआयची इच्छा !
     डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्यांच्या अन्वेषणाच्या संदर्भातील याचिका १६ डिसेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती कोलाबावाला यांच्या खंडपिठासमोर सुनावणीसाठी आली होती. या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त सॉलिसीटर जनरल श्री. अनिल सिंह यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) वतीने आपले म्हणणे मांडतांना स्कॉटलंड यार्डकडून अन्वेषण अहवाल मिळण्यास दिरंगाई होत असल्याने आम्ही सदर फोरेन्सिक तपासण्या देहली येथील फोरेन्सिक लॅबकडून करून घेऊ इच्छितो, असे सांगितले. त्या वेळी न्यायालयाने सीबीआयला पुन्हा फटकारत सांगितले, अशामुळे अन्वेषण लांबत आहे. उद्या तुमच्यावर मुद्दाम तपास लांबवला, असे आरोप होतील. स्कॉटलंड यार्डला पाठवण्याचा निर्णय तुमचा होता. आता तुम्ही निर्णय पालटत असाल, तर त्याला आमची ना नाही; परंतु दिरंगाई टाळली पाहिजे.
कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी सीबीआय आणि विशेष अन्वेषण पथक
यांच्यात समन्वय दिसत नाही ! - उच्च न्यायालयाकडून असमाधान व्यक्त
     कॉ. पानसरे हत्या प्रकरणात शासनाची बाजू मांडतांना ज्येष्ठ अधिवक्ता श्री. मुंदरगी यांनी आम्ही दुसर्‍या आरोपीच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून काही बाबतीत तपास अजून चालू आहे, असे सांगितले.
     त्यावर न्या. धर्माधिकारी यांनी त्यांना सीबीआयने दाखल केलेल्या अहवालातील काही माहिती आपल्या तपासासाठी उपयुक्त आहे. दोन्ही तपास यंत्रणांमध्ये (विशेष अन्वेषण पथक आणि सीबीआय यांच्यामध्ये) समन्वय असला पाहिजे. सध्या तो दिसत नाही, असे असमाधान व्यक्त केले.
     पानसरे आणि दाभोलकर कुटुंबियांच्या वतीने अधिवक्ता नेवगी यांनी आपली बाजू मांडतांना या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेलाही (एन्आयएला) प्रतिवादी करून घेण्यासाठी न्यायालयाची अनुमती मागितली, ती न्यायालयाने त्यांना दिली. या प्रकरणाची सुनावणी आता २० जानेवारी २०१७ या दिवशी होणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn