Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ९ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित करण्याचा न्यायालयाचा आदेश !

अधिवक्ता समीर पटवर्धन यांच्याकडून पुरवणी दोषारोपपत्र कह्यात ! 
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण ! 

     कोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी विशेष पथकाचे (एस्आयटी) अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी जिल्हा न्यायालयात सनातनचे साधक आणि संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर प्रविष्ट केलेले ४३८ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र डॉ. तावडे यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी ३० नोव्हेंबरला कह्यात घेतले. याच वेळी श्री. पटवर्धन यांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ९ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित करावे, अशी केलेली मागणी सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांनी मान्य केली, तसेच या दिवशी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेशही पोलिसांना दिला. 

     पत्रकारांशी बोलतांना अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन म्हणाले की, ९० दिवसांपासून डॉ. तावडे यांना न्यायालयात आणलेले नाही आणि त्यांची भेटही झालेली नाही. त्यामुळे आम्ही डॉ. तावडे यांना ९ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे. अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी पुढे सांगितले की, आरोपपत्राचा अभ्यास केला असता विशेष पथकाचे (एस्आयटी) अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी प्रविष्ट केलेल्या पुरवणी आरोपपत्रात सनातनचे साधक आणि कॉ. पानसरे प्रकरणातील संशयित आरोपी श्री. समीर गायकवाड यांच्यावर प्रविष्ट केलेली भा.द.वि. ३०२, ३०७, ३४ अशी कलमे डॉ. तावडे यांच्यावरही लावण्यात आल्याचे सकृतदर्शनी तरी दिसते; मात्र हा विरोधाभास आहे. या खटल्यात ३०२ हे कलम कसे लावले, ते पाहिले जाईल. 
     ९ डिसेंबरला डॉ. तावडे यांचा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्या न्यायालयात वर्ग होईल. त्या वेळी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांच्याकडून श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामिनाचा अर्ज प्रविष्ट केला जाण्याची शक्यता आहे. २ डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयात श्री. समीर गायकवाड यांच्यावरील आरोपनिश्‍चितीच्या संदर्भात सुनावणी होणार आहे. या खटल्यावरील स्थगिती न्यायालयाने उठवल्यानंतर जिल्हा न्यायालयात श्री. समीर गायकवाड आणि डॉ. तावडे यांच्यावर आरोप निश्‍चिती करून हा खटला चालू करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn