Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्र स्थापनेतील साधनेचे महत्त्व

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !
 
‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !
५. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने साधनेची आवश्यकता
५ उ. हिंदूसंघटनात अडथळा ठरणारा अहंकार दूर करण्यासाठी साधना उपयुक्त ! : ‘हिंदुत्वनिष्ठांमधील अहंकार हा हिंदूऐक्यातील प्रमुख अडथळा असतो. साधना केल्यामुळे अहंकार न्यून (कमी) होतो, नम्रता वाढते आणि इतरांशी जुळवून घेणे सोपे जाते. थोडक्यात, साधनेमुळे ईश्‍वरी गुण वाढतात. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक प्रतिदिन साधना करत असल्याने ते इतरांशी पटकन जुळवून घेतात.’ (२३.४.२०१२)
५ ऊ. साधना केल्याने प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी रहाता येणे : ‘साधना केल्याने आत्मबळ जागृत होत असल्याने व्यक्तीला तणावरहित आणि आनंदी जीवन जगता येते. साधनेमुळे ईश्‍वराचे साहाय्य मिळत असल्याने प्रतिकूल काळातही निराशा येत नाही. साधनेमुळे कर्मफळाची अपेक्षा न ठेवता कार्य करता येते आणि दु:ख न होता कर्मातून आनंद मिळतो. फळाची अपेक्षा न करता कार्य केल्यास तो निष्काम कर्मयोग होतो. यामुळे आध्यात्मिक प्रगतीही होते. ५ ऊ १. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याने कारागृहात शिक्षा भोगावी लागलेल्या सनातनच्या साधकांचे उदाहरण : मडगाव (गोवा) स्फोट प्रकरणी सनातनच्या काही साधकांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून त्यांना कारागृहात डांबले. त्या ४ वर्षांच्या कालावधीत सनातनचे साधक स्थिर आणि आनंदी होते. पोलीस अधिकार्‍यांनाही याचे आश्‍चर्य वाटले. सनातनचे साधक साधना करत असल्याने त्यांच्यात ‘ईश्‍वरेच्छा’ हा शब्दप्रयोग इतका भिनलेला असतो. त्यामुळे ‘प्रत्येक घटना ही ईश्‍वरेच्छा आहे’, असा विचार करून ते साक्षीभावाने (त्रयस्थपणे) त्या घटनेकडे पाहू शकले. ते दुःखी किंवा निराश झाले नाहीत; उलट कारागृहातही त्यांनी सण-उत्सव आदी साजरे करून हिंदु धर्मप्रसार करणे, तसेच धर्मांतर रोखणे इत्यादी कार्ये उत्साहाने केली.
५ ऊ २. सनातनच्या साधकांनी पोलिसांच्या दबावाला निर्भयतेने तोंड देणे : २००८ या वर्षापासून सनातनच्या अनेक साधकांची सातत्याने विनाकारण पोलीस चौकशी होत आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी साधकांना विविध प्रकारे धमकावले आहे. तसेच पोलीस ठाण्यात बसवून त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी तर एक-दोन साधकच असायचे. त्यांना धीर देण्यासाठीही इतर कोणी नसायचे.
   इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही सनातनचे साधक डगमगले नाहीत किंवा पोलिसांच्या जाचाला घाबरून त्यांनी धर्मप्रसाराचे कार्य करणे सोडले नाही. नियमित साधनेचे बळ, तसेच प्रार्थना आणि नामजप यांच्या आधारे ते या कठीण प्रसंगांनाही सामोरे जाऊ शकले.’ (३.५.२०१४)
५ ए. ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक करा ! : ‘ईश्‍वरप्राप्ती, म्हणजेच मोक्षप्राप्ती हेच मनुष्यजन्माचे ध्येय असल्याने सर्वांनीच साधना करणे आवश्यक आहे. आद्यशंकराचार्य म्हणतात,
लब्ध्वा कथञ्चित् नरजन्म दुर्लभं । तत्रापि पुंस्त्वं श्रुतिपारदर्शनम् ॥
यस्त्वात्ममुक्तौ न यतेत मूढधीः । स ह्यात्महा स्वं विनिहन्त्यसद्ग्रहात् ॥
- विवेकचूडामणि, श्‍लोक ४
अर्थ : अत्यंत दुर्लभ असा मनुष्यजन्म आणि त्यातही साधना करण्याची क्षमता (पौरुषत्व) अन् साधनेसाठी आवश्यक अशी बुद्धी (श्रुतिपारदर्शता) प्राप्त होऊनही जो मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही, तो खरोखर स्वतःचा घात करणारा मूर्ख होय. असा मनुष्य अज्ञानामुळे स्वतःचा नाश ओढवून घेतो.
आपल्या सर्वांना दुर्लभ असा मनुष्यजन्म मिळाला आहे, तर या जन्माचे सार्थक करण्यासाठी साधना करा ! सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते साधना करत असल्याने त्यांनी व्यष्टी जीवनात मोक्षप्राप्ती आणि समष्टी जीवनात हिंदु राष्ट्राची स्थापना हे ध्येय ठेवले आहे.
धर्मप्रेमींनी स्वतः साधना करावी ! साधना केल्यानेच आपल्याला राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला ईश्‍वराचा आशीर्वाद मिळेल अन् ते कार्यही अधिक परिणामकारक होईल ! राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्या अंगी जन्मजात असलेले क्षात्रतेज, तसेच साधना करून मिळवलेलेे ब्राह्मतेज एकत्र झाले की, हिंदु राष्ट्र स्थापणे सुलभ होईल !’ (३.५.२०१४) (क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’)
हा ग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध !
यासाठी ‘सनातन शॉप’ च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn