Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

माऊलींच्या समाधीला प्रसाद दाखवण्यावरून मतभेद

विश्‍वशांती केंद्र आणि आळंदी देवस्थान यांमध्ये वादंग
     आळंदी (जिल्हा पुणे), ३ डिसेंबर - २७ नोव्हेंबर या दिवशी श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान आणि विश्‍वशांती केंद्राचे डॉ. विश्‍वनाथ कराड, तसेच अन्य पदाधिकारी यांच्यामध्ये वाद झाला. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधीला नैवेद्य अर्पण करण्यावरून दोन्ही संस्थांच्या पदाधिकार्‍यांमध्ये धक्काबुक्की झाली. 
१. यावर आळंदी देवस्थानने निवेदन प्रसिद्ध करून देवस्थानची बाजू मांडली. देवस्थानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंदिरातील वीणा मंडपात सकाळी १० ते १२.३० या वेळेत कीर्तनसेवा चालू असतांना नैवेद्य दाखवण्याचा संकेत नाही. समाधी सोहळ्याचे कीर्तन होऊन परंपरेनुसार मानाचे श्रीफळ वाटप झाल्यानंतर संस्थानचा महानैवेद्य अर्पण होतो. त्यानंतर अन्य भाविकांना त्यांचे नैवैद्य अर्पण करण्यासाठी गाभार्‍यात प्रवेश दिला जातो. २७ नोव्हेंबर या दिवशीही प्रथेप्रमाणे विश्‍वशांती केंद्राच्या पदाधिकार्‍यांना संस्थानचा महानैवेद्य अर्पण झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याविषयी सांगण्यात आले; मात्र विश्‍वशांती केंद्राच्या पदाधिकार्‍यांनी सुरक्षाव्यवस्था भेदून प्रथेचे उल्लंघन करत गाभार्‍यात प्रवेश केला. या कालावधीत डॉ. विश्‍वनाथ कराड यांचे खाजगी सुरक्षारक्षक आणि संस्थानचे कर्मचारी यांच्यामध्ये झटापट झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून वादावर पडदा टाकण्याची चर्चा झाली; मात्र तरीही एम्आयटीचे कर्नल तांदळे यांनी विपर्यस्त आणि असत्य वृत्त प्रसिद्धीस दिले. त्यामुळे संस्थानची भूमिका मांडणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. 
२. याविषयी एम्आयटीचे कर्नल विलास तांदळे यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले होते की, विश्‍वशांती केंद्राचे पदाधिकारी माऊलींच्या समाधीला प्रसाद दाखवण्यासाठी दर्शन रांगेत उभे होते; मात्र देवस्थानचे पदाधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी यांच्याकडून त्यांना अयोग्य वागणूक मिळाली. मंदिरात चालू असलेले काल्याचे कीर्तन संपल्याविना समाधीला नैवेद्य दाखवता येणार नाही, असे सांगून दमदाटी करण्यात आली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn