Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महर्षींच्या कृपेमुळे प्रवासात एके ठिकाणी प्रत्यक्ष प.पू. अनंतानंद साईश यांचे मानवी रूपात दर्शन होणे आणि त्या वेळी ‘जीवन कृतार्थ झाले’, असे वाटणे

प.पू. अनंतानंद साईश यांच्या महानिर्वाणोत्सवाच्या निमित्ताने...
     ‘आम्ही महर्षींच्या आज्ञेप्रमाणे म्हैसुरूहून होसूरकडे जायला निघालो. वाटेत इंधन भरण्यासाठी एका पेट्रोलपंपावर थांबलो. त्या वेळी गाडीजवळ एक व्यक्ती आली. या व्यक्तीने मला चंदनाचे दोन करंडे विकत दिले आणि ‘यात पूजेसाठी हळद-कुंकू ठेवा’, असे सांगितले आणि आणखी एक डबी देऊन ‘ही तुम्हाला बांगड्या, कानातले ठेवायला घ्या’, असे ते म्हणाले. ती व्यक्ती गरीब दिसल्याने तिला साहाय्य म्हणून मी ते करंडे विकत घेतले. त्यानंतर त्यांनी उदबत्तीची तीन घरेही आम्हाला दिली. त्यानंतर माझ्या हळूहळू लक्षात यायला लागले, ‘ही व्यक्ती सामान्य नाही. हिंचा पोशाख अगदी अनंतानंद साईशांसारखा आहे. या व्यक्तीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनंतानंद साईशच आम्हाला आशीर्वाद देण्यास आले आहेत.’ अनंतानंद साईश म्हणजे प.पू. डॉक्टरांच्या गुरूंचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) गुरु.
सद्गुरु
(सौ.) अंजली गाडगीळ
१. मानवी रूपात आलेल्या प.पू. अनंतानंद साईश यांची वक्तव्ये
अ. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, ‘‘लवकरच रामराज्य येईल. साईबाबांनंतर मलाच सगळे ओळखतात. मी सतत तुमच्याबरोबरच असतो. तुम्ही मला पाहिले नाही, तरी माझे तुमच्याकडे पूर्ण लक्ष आहे. मी सतत तुझ्या हृदयातच असतो. सर्वजण मला ‘बाबा’ म्हणतात.’’
आ. तुझ्या गाडीला शोधत मी तुमच्या मागे आलो आहे. मी श्रीरंगपट्टणम्हून आलो आहे. (श्रीरंगपट्टणम्ला शेषशायी विष्णूचे प्रसिद्ध देऊळ आहे. - (सद्गुरु) सौ. गाडगीळ)
इ. तुमचे आता ७५ टक्के कार्य झाले आहे, आता केवळ २५ टक्के कार्य बाकी आहे. पुढच्या वर्षी तुम्ही पहा कुठच्या कुठे पोहोचता ते !
मानवीरूपात आलेले प.पू. अनंतानंद साईश आशीर्वाद देतांना
सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आणि
प.पू. अनंतानंद साईश यांचा होत असलेला वार्तालाप
प.पू. अनंतानंद साईश यांच्या हातांवरील रेषा 
‘सबका मालीक एक’, हे साईबाबांचे प्रसिद्ध वचन
लिहिलेला ट्रक (अक्षरे चौकोनात मोठी करून दाखवली आहेत.)
ई. आम्ही दिलेल्या हातातील रुपयांच्या नोटेकडे पाहून ते म्हणाले, ‘‘ये कागजके टुकडे सैतान जैसे है ।’’
उ. मला उद्देशून म्हणाले, ‘‘ही मुले म्हणजे तुझ्या जिगरचे (काळजाचे) तुकडेच आहेत.’’ 
ऊ. त्यांच्या हातांवरच्या रेषा पाहून मी त्यांना म्हटले, ‘‘तुमच्या हातांवरच्या रेषा फारच निराळ्या आहेत.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘सहसा मी कुणाला माझा हात दाखवत नाही. माझा हात सर्वांपेक्षा निराळा आहे. माझ्या हातावर विष्णुचक्र आहे. हाताच्या तर्जनीवर एक चक्र आणि बाकी हातांच्या बोटांवर शंख आहेत.’’ 
    ते हिंदीत बोलत होते. ‘मी एक फकीर आहे’, असे ते सांगत होते. आम्ही त्यांचे भ्रमणभाषवर चित्रीकरण केले आहे.
२. महर्षींनी नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी होसूरला 
पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी घेतलेल्या घरामध्ये प.पू. डॉक्टर, 
प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. अनंतानंद साईश यांच्या प्रतिमा 
ठेवून पूजा करण्यास सांगणे अन् त्यासाठी आदल्या दिवशी होसूरला जात असतांना 
वाटेत प.पू. अनंतानंद साईश यांनी प्रत्यक्ष मानवी रूपात येऊन दर्शन देणे, हा मोठा योगायोग असणे 
    महर्षींनी आम्हाला सांगितले होते, ‘पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी घेतलेल्या घरामध्ये तुम्हाला प.पू. डॉक्टर, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. अनंतानंद साईश यांच्या प्रतिमा ठेवून उद्या नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजे २.१०.२०१६ या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे. त्या घराच्या पूर्वेकडच्या दरवाजाला प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र, तर दक्षिणेकडे असणार्‍या दरवाजाला प.पू. अनंतानंद साईश यांचे छायाचित्र लावायचे आहे. पुढे आपत्काळात हे घर म्हणजे तुमचा आश्रमच होणार आहे.’ यासाठी आम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी होसूरकडे जायला निघालो असतांना पेट्रोलपंपावर आम्हाला प.पू. अनंतानंद साईशांनी प्रत्यक्ष मानवी रूपात येऊन दर्शन दिले. केवढा हा योगायोग !
३. महर्षींनी मानवी रूपातील प.पू. अनंतानंद साईश यांच्याविषयी सांगितलेली माहिती 
     प.पू. अनंतानंद साईशांच्या प्रत्यक्ष दर्शनाविषयी महर्षींना सांगितले असता ते म्हणाले, ‘ज्या पेट्रोलपंपावर त्यांनी तुम्हाला दर्शन दिले, त्याच्या मागे ‘रामकृष्ण’ असे लिहिलेला फलक आहे का, ते पहा.’ आम्ही त्या वेळी काढलेले छायाचित्र पाहिले असता, खरंच त्या छायाचित्रात ‘रामकृष्ण’ असे नाव लिहिलेला फलक असल्याचे लक्षात आले. साईशांच्या दर्शनानंतर आम्ही पुढे प्रवासाला प्रारंभ केला, तर आमच्या समोरच चाललेल्या ट्रकवर ‘सबका मालीक एक’, हे साईबाबांचे प्रसिद्ध वचन लिहिलेले आम्हाला आढळले. तसेच गाडीवर ॐ काढलेला होता आणि ‘त्यात महर्षिच बसलेले आहेत कि काय’, असे वाटत होते. ही गाडीसुद्धा शिर्डीजवळचीच होती. महर्षींनी या अनुभूतीचा उलगडा करतांना पुढे सांगितले, ‘पहिल्यांदा त्यांनी तुम्हाला दोन करंडे दिले म्हणजे त्यांनी कार्तिकपुत्री (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आणि उत्तरापुत्री (सद्गुरु (सौ.) बिंदाताई) अशा दोघींनाही आता सद्गुरुरूपात स्वीकारले आहे. त्यानंतर त्यांनी प.पू. डॉक्टरांचे प्रतीक म्हणून मोठा करंडा दिला आणि उदबत्तीची ३ घरेही दिली, तीही ‘तिघांच्या अलौकीक कार्याचे प्रतीक’ म्हणूनच ती दिली.’
     अशा तर्‍हेने आम्हाला महर्षींनी प्रत्यक्ष प.पू. अनंतानंद साईशांचे मानवी रूपात दर्शन घडवून गुरुपरंपरेचा आशीर्वादच मिळवून दिला. याबद्दल आम्ही महर्षींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.’
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (२.१०.२०१६, रात्री ८.५३)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn