Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी गुजरात, तेलंगण आणि केरळ या राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून आंदोलन अन् निवेदन सादर !

इंदूर येथे आंदोलनात सहभागी धर्माभिमानी आणि बोलतांना श्री. नेल्ला तुकाराम

गुजरातमध्ये आंदोलन करतांना धर्मप्रेमी
मुंबई - ३१ डिसेंबरच्या रात्री ख्रिस्ती नववर्षाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने तेलंगण राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन आणि निवेदन यांद्वारे केली आहे. या आंदोलनांमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. तसेच गुजरातची राजधानी असलेल्या कर्णावती येथील मणीनगर परिसरात १८ डिसेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. केरळमधील एर्नाकुलम् येथे समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. या सर्वच ठिकाणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
तेलंगणमध्ये विविध जिल्ह्यांत आंदोलन 
१. नववर्षाच्या नावाखाली चाललेल्या अपप्रकारांविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने इंदूर (निजामाबाद) येथील जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये हिंदु जनजागृती समितीसह लष्कर-ए-हिंद, शिवसेना, हनुमान देवालय परिरक्षण समिती आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
२. करीमनगरचे पोलीस आयुक्त कमलाहसन रेड्डी यांना एक निवेदन देण्यात आले. या वेळी करीमनगर आर्य समाजाचे अध्यक्ष श्री. सूर्यप्रकाश राव आणि भवसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष श्री. दौलागर सुधाकर राव उपस्थित होते. तसेच करीमनगर जिल्ह्याचे महसूल अधिकारी श्री. वीरा ब्रह्माय्या यांनाही याविषयी निवेदन देण्यात आले.
३. नलगोंडाचे जिल्हाधिकारी गौरव उप्पल आणि नलगोंडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रभाकर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समिती, संस्कार भारती, पर्यावरण परिरक्षण समिती आदी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्णावती, गुजरात येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन 
   ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखावेत, या मागणीसाठी कर्णावती येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. याबरोबरच बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंवर होणारे अत्याचार अन् तेथील मंदिरांची तोडफोड रोखण्यासाठी केंद्र सरकारने कृतीशील व्हावे, तेथील हिंदूंच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, यासाठी आंदोलन करून नंतर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
एर्नाकुलम् (केरळ) जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर
एर्नाकुलम् - येथील जिल्हाधिकारी के. महंमद सरीफुल्लाह यांना नुकतेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुमा पुथलत आणि श्री. बालकृष्णन् यांनी हे निवेदन सादर केले. ३१ डिसेंबरच्या रात्री पर्यटन स्थळे, उद्यान इत्यादी सार्वजनिक ठिकाणी नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn