Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राहीन सदैव मी तुझी ऋणी ।

माझ्या जीवनाची सांगाती कन्या माझी सुधा गोजरी ।
कशी होऊ गं उतराई, तुझे उपकार अनंत माझ्यावरी ॥ १ ॥

सतत सोबती असतात, त्यांच्या स्मृती नसतात ना गं ।
जो दूर असतो, त्याच्या विरहाच्या स्मृती रहातात ना गं ॥ २ ॥

तू माझ्या हृदयात आहेस, माझ्यापासून वेगळी नाहीस गं ।
हेच तुझ्या स्मृतींचे वैशिष्ट्य आहे ना गं ॥ ३ ॥
तू माझी सखी अन् तूच माझी सोबती आहेस गं ।
भगवंताच्या स्मृतींमध्ये तुझ्या स्मृती 
सामावल्या आहेत गं ॥ ४ ॥

क्षमा कर या आईला नको असा रुसवा धरू ।
किती राहिले गं दिवस माझे, नको ना गं ओझं देऊ ॥ ५ ॥

जाईन मी निवांत भगवंताच्या चरणी ।
कर क्षमा मला, राहीन सदैव मी तुझी ऋणी ॥ ६ ॥

सुधाला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावे, 
अशी भगवन् नारायणाकडे आणि परात्पर गुरु डॉक्टरांकडे प्रार्थना करते. 
- पू. नेनेआजी (आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn