Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) पंतप्रधान मोदी यांच्या भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे !

राहुल गांधी यांचा हास्यास्पद दावा !
पुरावे आहेत, तर ते लोकांसमोर उघड का करत नाहीत ? बोफोर्स, कोळसा
खाण वाटप, २-जी, राष्ट्रकुल, आदर्श आदी काँग्रेसच्या काळात झालेल्या
भ्रष्टाचाराचे पुरावे राहुल गांधी कधी सादर करणार आहेत, हेही त्यांनी सांगावे !
      नवी देहली - माझ्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची तपशीलवार माहिती आहे. मला हे सगळे लोकसभेत मांडायचे आहे; मात्र मला सभागृहात बोलू दिले जात नाही, असा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. (लोकसभेत बोलू दिले जात नाही, तर हे पुरावे जनतेसमोर जाऊन का उघड करत नाहीत ? त्यासाठी त्यांना कोणी रोखले आहे ? मात्र अशी विधाने करून राहुल गांधी पुन्हा एकदा स्वतःचे हसे करून घेत आहेत ! - संपादक)      राहुल गांधी पुढे म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून सर्व विरोधी पक्षांना लोकसभेत कामकाज व्हावे, असे वाटते; मात्र पंतप्रधान मोदी आणि सरकारला ते नको आहे. (चोराच्या उलट्या बोंबा ! काँग्रेससहित विरोधी पक्षांकडून घालण्यात येणार्‍या गदारोळामुळेच संसदेचे कामकाज होत नाही ! - संपादक) लोकसभेत मला बोलू दिल्यास आपले बिंग फुटेल, अशी भीती मोदी यांना वाटते. त्यामुळेच मला घाबरून मोदी नोटाबंदीवरील चर्चेपासून दूर पळत आहेत. सरकारने आम्हाला सभागृहात बोलू द्यावे. नोटाबंदीचा निर्णय हा त्यांनीच घेतल्यामुळे ते देशाला स्पष्टीकरण देण्यास बांधील आहेत.
उद्योगपतींसाठी नोटाबंदीचा निर्णय !
      तत्पूर्वी १३ डिसेंबरला उत्तरप्रदेशातील दादरी येथेही राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, देशातील बड्या उद्योगपतींनी बँकांकडून तब्बल ८ लाख कोटी रुपयांची कर्जे घेतली आहेत. उद्योगपती हे पैसे परत देत नसल्याने ही कर्जे बँकांसाठी अनुत्पादक ठरली आहेत. यामध्ये बँकांकडील निधीचा मोठा भाग अडकून पडल्यामुळे बँका नवीन कर्ज देऊ शकत नाहीत. नवीन कर्ज द्यायचे असल्यास उद्योगपतींकडील ही येणी वसूल होणे आवश्यक आहे; मात्र याच उद्योगपतींनी निवडणुकीत मार्केटिंग केल्याने मोदी त्यांच्याकडून पैसे परत मिळवू शकत नाहीत. त्यामुळेच बँकांना पुन्हा कार्यरत करण्यासाठी मोदी तुमच्याकडून पैसे काढत आहेत. या माध्यमातून बँका नवी कर्जे देऊ शकतील; मात्र या सगळ्या प्रक्रियेसाठी बँकांना ६-७ मासांचा कालावधी लागेल. इतका काळ सामान्यांचा पैसा बँकांमध्ये अडकवून ठेवण्याच्या उद्देशानेच मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
राहुल गांधी यांच्या आरोपात तथ्य नाही ! - भाजप
     राहुल गांधी यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. सरकार अधिवेशन चालू झाल्यापासून चर्चेला सिद्ध आहे; मात्र विरोधक संसदेचे कामकाज चालू देत नाहीत, हे दुर्दैव आहे. राहुल गांधी यांच्याकडे काही माहिती असती, तर त्यांनी २० दिवसांमध्ये ती उघड केली असती; मात्र अद्यापपर्यंत त्यांनी भूकंप घडवणारे गौप्यस्फोट केलेले नाहीत, असेही केंद्रीयमंत्री अनंतकुमार यांनी म्हटले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn