Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील तुटलेली तलवार पालटली !

   मुंबई, १३ डिसेंबर (वार्ता.) - हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर मेघडंबरीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या हातातील तुटलेली तलवार ११ डिसेंबर या दिवशी सकाळी ७ वाजता पालटून नवीन तलवार बसवण्यात आली. १० डिसेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या हातातील ही तलवार तुटल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची प्रचंड मोठी लाट उसळली होती. एकीकडे सहस्रों कोटी रुपये खर्चून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणाबाजी राज्य शासन करत असतानाच हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांची तलवारही सुरक्षित नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. धर्माभिमानी श्री. सतीश घारगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी नवी तलवार अति जलद वेगाने सिद्ध केली. 
   ५० इंच लांबीची आणि जवळपास २५ किलो वजनाची ही तलवार घडवण्यात आली. असे प्रकार भविष्यात होऊ नये यासाठी मेघडंबरीजवळ दोन ‘सीसीटीव्ही’ बसवण्यात आले आहेत. या घडलेल्या संतापजनक घटनेनंतर शिवभक्तांनी किल्ले रायगडावर धाव घेतली होती आणि पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. श्री. सतीश घारगे म्हणाले, ‘‘तुटलेली तलवार ही साधारण पाच ते सव्वापाच फुटांची होती आणि ती पूर्णत: तांब्याची बनवलेली होती. ती बराच काळ टिकावी यासाठी योग्य प्रमाणात धातूचा वापर त्यासाठी करण्यात आलेला होता. ही तलवार सहजासहजी तुटणे शक्य नव्हते. बळाचा वापर झाल्याशिवाय असे घडणार नाही.’’
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn