Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

क्षमतेपेक्षा अधिक संख्येने विद्यार्थी नेणार्‍या रिक्शांवर कारवाई करणार ! - परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते

      नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - वैध क्षमतेपेक्षा अधिक संख्येने विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्शा आणि रिक्शामध्ये अवैधरित्या फळी लावून अधिक विद्यार्थी नेणार्‍या रिक्शा यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांनी परिषदेच्या प्रश्‍नोत्तराच्या तासामध्ये पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणार्‍या बसगाड्यांच्या पडताळणीवरून विचारलेल्या प्रश्‍नावरील चर्चेत श्री. रावते यांनी ही माहिती दिली. श्री. रावते यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसगाड्यांची पुनर्पडताळणी करण्यात येत आहे. अशी पडताळणी न करणार्‍या २८० वाहनधारकांच्या वाहनांची नोंदणी निलंबित करण्याची प्रक्रिया चालू आहे. तसेच अशा बसगाड्यांविषयी शालेय आणि परिवहन सचिव यांच्या स्तरावर शालेय बसगाड्यांचे नवीन धोरण सिद्ध केले जात आहे.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn