Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु देवतांच्या नावाने बियरचे उत्पादन करणार्‍या स्पेनच्या आस्थापनाकडून क्षमायाचना !

परदेशातील हिंदू आणि त्यांचे नेते देवतांच्या विडंबनाचा विरोध करतात अन् त्यांना 
यश मिळते; मात्र भारतात हिंदूंचे नेते देवतांच्या विडंबनाच्या विरोधात निष्क्रीय रहातात ! 
हिंदूंनी केलेल्या निषेधाची फलश्रुती !
     नेवाडा (अमेरिका) - स्पेनमधील इबिझा बेटावरील ‘इबोसिम ब्रेहाऊस मायक्रोब्रेव्हरी’ या बियरचे उत्पादन करणार्‍या आस्थापनाने हिंदु देवतांच्या नावाने बियर काढून तिची विक्री चालवली होती. शिव, काली, श्री गणेश, हनुमान या हिंदु देवतांची चित्रे आणि नावे यांसह बियरची निर्मिती करणार्‍या या आस्थापनाचा हिंदूंनी निषेध केला होता. ‘हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करण्याचा आमचा उद्देश नव्हता. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर आम्ही क्षमायाचना करतो’, असे या आस्थापनाने अमेरिकेतील हिंदु नेते श्री. राजन झेद यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
     बियर आस्थापनाने व्यक्त केलेल्या क्षमायाचनेचे आम्ही स्वागत करतो; मात्र तेवढ्यापुरते न थांबता सदर आस्थापनाने हिंदु देवतांच्या नावाच्या बियरची विक्री तातडीने थांबवावी, असे श्री. झेद यांनी नेवाडा येथून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. व्यावसायिक लाभ उठवण्यासाठी हिंदु देवतांचा वापर करणे अयोग्य आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर होतो. बियरच्या बाटल्यांवर हिंदु देवतांची चित्रे छापणे हा हिंदु देवतांचा अवमान आहे, असे श्री. झेद यांनी म्हटले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn