Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विदेशी गायींमुळे ओझोनच्या थराला छिद्रे पडतात ! - गुजरातमधील संशोधकांचा निष्कर्ष

भारतीय गायींचे महत्त्व आतातरी केंद्र सरकारच्या लक्षात
येऊन देशात गोहत्याबंदीसह गोमांस निर्यातीवर बंदी घालणार का ?
     कर्णावती - परदेशी गायींमुळे ओझोनच्या थरावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष जामनगर येथील गुजरात आयुर्वेद विद्यापिठाच्या संशोधकाने काढला आहे. परदेशी गायींमुळे ओझोनच्या थराला पडलेले छिद्र वाढत चालले आहे. त्याच वेळी भारतीय गायी जागतिक तापमान वाढीला उत्तरदायी नाहीत, असे या संशोधकाने म्हटले आहे.
     गुजरात गौसेवा आणि गौचर विकास बोर्डाने डॉ. हितेश जानी यांच्यावर संशोधनाचे दायित्व सोपवले होते. हितेश जानी यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, भारतात जर्सी जातीच्या गायींऐवजी आपण अल्प खर्चाच्या देशी जातीच्या गायी पाळण्याला प्राधान्य देतो. जर्सी गायींना भरपूर खाद्य आणि पाणी लागते. त्यामुळे त्या अनेकदा आजारी पडतात. या गायी मिथेन गॅस सोडतात. त्याच्या परिणामामुळे वातावरणातील ओझोनचे छिद्र वाढत चालले आहे. परदेशी गायींचे दूध अनेक आजारांना कारण ठरते, तर देशी गायींच्या दुधापासून सर्व आजारांवर उपचार होतात.
ओझोन म्हणजे काय ?
     ओझोन हा नैसर्गिक पद्धतीने निर्माण होणारा वायू पृथ्वीपासून १० ते ४० कि.मी. अंतरावर ९० टक्के प्रमाणात असल्यामुळे सूर्यप्रकाशाद्वारे येणारे हानीकारक अतीनील किरण शोषून घेऊन मानवजातीची, वनस्पतीची, प्राण्याची तसेच जीवसृष्टीची हानी टाळतो. गेल्या ५० वर्षांत प्रदूषित वायूमुळे ओझोन वायूच्या संरक्षक थराला अनेक ठिकाणी भोके पडलेली आहेत. यामुळे जगापुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अतीनील किरण जर पृथ्वीवर पोचले, तर पूर्ण जीवसृष्टीचा विनाश होऊ शकतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn