Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

व्यष्टी साधनेत अहं-निर्मूलन न झाल्यास साधक त्याच टप्प्याला रहाणे आणि समष्टीत साधना करतांना अन्य साधकासमवेत मिसळल्याने आणि मनाविरुद्ध घडणार्‍या विविध प्रसंगांतून साधकाचा अहं आपोआप न्यून होण्यास साहाय्य होणे

श्री. राम होनप
‘व्यष्टी साधना करणार्‍या साधकांत काही गुण असतात. साधनेची तीव्रता आणि त्यानुरूप येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती यांचा त्याला अहं निर्माण होऊ शकतो. अहं-निर्मूलन न झाल्यास साधक आयुष्यभर त्याच टप्प्याला राहू शकतो. समष्टी साधनेत अन्य साधकांत मिसळल्यानेे अहं वाढत नाही आणि वाढल्यास समष्टीत मनाविरुद्ध घडणार्‍या विविध प्रसंगांतून तो आपोआप न्यून होण्यास साहाय्य होते. त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
   एखाद्या आधुनिक वैद्याने पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवले आणि त्याच्या मनात आले की, ‘मी मोठा त्याग करून आश्रमात आलो आहे’, तर आश्रमात आल्यावर त्याच्या लक्षात येते की, ‘आश्रमात अनेक तज्ञ आधुनिक वैद्य अनेक वर्षांपासून पूर्णवेळ साधना करत आहेत.’ एखाद्या साधिकेला चांगले गायन येत असल्यास तिची कालांतराने अन्य सुंदर गाणार्‍या आणि त्यातील पुष्कळ ज्ञान असलेल्या साधिकांची ओळख होते. त्यामुळे तिच्यात ‘मलाच चांगले गायन येते’, हा अहं निर्माण होत नाही. एखाद्याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यावर पुढील ८ दिवसांत काही साधकांची एकाच दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झालेली असते. त्यामुळे अशा साधकाच्या मनात ‘माझीच आध्यात्मिक उन्नती होत आहे’, हा विचार येत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या साधकाला ईश्‍वरी ज्ञान मिळू लागले, तर कालांतराने अनेक साधकांना ज्ञान मिळू लागते. ‘मी तीव्र साधना करून संतपद गाठले’, असा संबंधित संतांंच्या मनात विचार येण्याचा अवकाश की, त्याच सप्ताहात एखाद्या साधकाने संतपद गाठलेले असते. या सर्वांना एक अपवाद आहेत ते म्हणजे 
   प.पू. डॉक्टर; कारण त्यांच्यासारखे कुणी नाही. त्यांच्यातील अहंचा मृत्यू झाला आहे आणि तो परत जन्माला येत नाही. त्यामुळे ते एकमेवाद्वितीय आहेत.’
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०१६) धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn