Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राज्याचे महाअधिवक्ता पद रिक्त असल्याप्रकरणी शासनाने उत्तर सादर करावे ! - सभापतींचे आदेश

विधान परिषद
      नागपूर, ८ डिसेंबर (वार्ता.) - राज्याचे महाअधिवक्ता पद हे गेले ८ मास रिक्त असून अशी कृती घटनाबाह्य असल्याची सूचना काँग्रसचे आमदार संजय दत्त यांनी विधान परिषदेत सादर केली. त्यावर नियम २८९ अन्वये चर्चा घ्यावी, असेही त्यांनी प्रविष्ट केलेल्या प्रस्तावात म्हटले होते. त्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी चर्चेचा प्रस्ताव तात्पुरता फेटाळून लावत महाअधिवक्ता पद रिक्त असल्याप्रकरणी शासनाला उत्तर सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. (इतके महत्त्वाचे पद रिक्त असणे, हे राज्य सरकारला लज्जास्पद नव्हे का ? या प्रकरणी सरकार कोणता निर्णय घेणार आहे ? - संपादक)
      दत्त यांनी प्रस्तावावर बोलतांना म्हटले की, यापूर्वीचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी राजीनामा देऊन २६१ दिवस झाले, तरी हे रिक्त पद सरकारने भरलेले नाही. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही प्रविष्ट झाली असून त्यावर न्यायालयानेही हे पद लवकर भरण्याविषयी सांगितले आहे. राज्याचे संवैधानिक पद भरण्यास राज्य सरकार दिरंगाई करत आहे. 
संगणक शिक्षकांच्या मोर्च्यावर झालेल्या लाठीमार प्रकरणी सरकारने निवेदन सादर करावे ! - सभापती
      परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी नियम २८९ अन्वये चर्चेचा प्रस्ताव सादर केला. त्यावर ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी विधीमंडळावर संगणक शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. त्या मोर्च्यावर पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यांच्यावर ३०७ चे गुन्हे प्रविष्ट केले आहेत. त्या प्रकरणी सरकारने गुन्हे मागे घ्यावेत आणि त्यावर उत्तर द्यावे. यावर सभापती नाईक-निंबाळकर यांनी चर्चेचा प्रस्ताव तात्पुरता फेटाळून लावत संगणक शिक्षकांच्या मोर्च्यावर झालेल्या लाठीमार प्रकरणी सरकारने निवेदन सादर करण्याचे आदेश दिले.
    या दोन चर्चेच्या प्रस्तावानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकार्‍याला धमकावल्याप्रकरणी चर्चेचा प्रस्ताव सादर केला. सभापतींनी हा प्रस्तावदेखील तात्पुरता फेटाळून लावला.-
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn