Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग हे शाश्‍वत सत्य ! - पंचखंड पीठाधीश्‍वर आचार्य धर्मेंद्रजी महाराज

     पुणे, ४ डिसेंबर - काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तेच शाश्‍वत सत्य आहे, हे पाकिस्तानसह देशविरोधी भूमिका मांडणार्‍या तथाकथित नेत्यांनी लक्षात घ्यावे, असे स्पष्ट प्रतिपादन राजस्थान येथील पंचखंड पीठाधीश्‍वर समर्थ गुरुपाद आचार्य स्वामी श्री धर्मेंद्रजी महाराज यांनी केले. 
    विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. माईर्स एम्आयटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला माईर्स एम्आयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, डॉ. संजय उपाध्ये आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    आचार्य धर्मेंद्रजी महाराज म्हणाले की, कृष्ण-कंस, राम-रावण, पांडव-कौरव अशी चांगला आणि वाईट यांचा विचारप्रवाह आपल्याकडे पुरातन काळापासून आहे. त्यामुळे विचारांतील मतभिन्नता नेहमीच रहाणार. अहिंसा हा जीवनाचा योग्य मार्ग असला, तरी आवश्यक तेथे हिंसा आवश्यकता आहे. विज्ञानाचा अंगीकार करतांना त्यात करुणा आणि वात्सल्य असले पाहिजे. केवळ संपन्न असून चालणार नाही, तर त्यासाठी सफल असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत रामदास, छत्रपती शिवाजी महाराज ही माझ्या जीवनातील प्रेरणास्थाने आहेत. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा, गड-किल्ले, देवस्थाने हीच भारतीय संस्कृतीची ओळख आहे आणि ती आपण सर्वांनी जपली पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn