Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांना भावप्रयोग करतांना ‘सर्व साधक देवगणांच्या रूपात दिसणे आणि साधकांविषयी मनात प्रतिक्रिया येण्यापूर्वीच त्या विरून जाणे’ याविषयी आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत 
मानस जाण्याचा भावप्रयोग करतांना ‘ते खोलीच्या 
रूपातील क्षीरसागरात विष्णुरूपात शेषावर पहुडले असून 
स्वतःसह सर्व साधक त्यांच्याभोवती देवगणांच्या 
रूपात नमस्काराच्या मुद्रेत उभे आहोत’, असे जाणवणे 
     ‘१३.११.२०१६ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील दैनंदिन भावसत्संगामध्ये आम्हाला भावप्रयोगाच्या अंतर्गत सांगितले, ‘‘मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाऊन त्यांचे दर्शन घेऊन या.’’ त्यानुसार मी डोळे मिटले आणि मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेले. तेव्हा मला जाणवले, ‘खोलीच्या जागी क्षीरसागर आहे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले क्षीरसागरात विष्णुरूपात शेषावर पहुडले आहेत. सर्व साधक त्यांच्याभोवती देवगणांच्या रूपात नमस्काराच्या मुद्रेत उभे आहेत. तेव्हा त्या सर्व देवगणांचे श्रीविष्णूशी संपूर्ण अनुसंधान चालू आहे आणि त्या देवगणांत मीही आहे.’
२. साधक देवगणांच्या रूपात दिसल्यामुळे मनातील पूर्वग्रह 
आणि भय दूर होणे आणि मनावरील ताण दूर होऊन हलकेपणा जाणवणे 
     ज्या साधकांविषयी माझ्या मनात पूर्वग्रह आणि भय होते, ते साधक या अनुभूतीत मला त्यांच्या मूळ देवगणांच्या रूपात दिसले. तेव्हा मला देवाच्या कृपेने ‘आता त्यांच्याविषयी माझ्या जीवनात जे घडत आहे, ते केवळ माझ्या प्रारब्धानुसार आहे. त्यामुळे त्या साधकांना त्याविषयी उत्तरदायी धरण्यात काहीच अर्थ नाही’, याची जाणीव झाली. साहजिकच माझ्या मनावरील ताण दूर होऊन मला पुष्कळ हलकेपणा जाणवला. 
३. नंतर देवगण रूपातील अनुसंधानातील आनंद अनुभवता येणे 
आणि पुढे ५ दिवसांनंतरही एखाद्या साधकाविषयी प्रतिक्रिया निर्माण होण्यापूर्वीच 
स्वतःला त्या अनुभूतीमधील देवगण रूपाची जाणीव होऊन मनातील प्रतिक्रिया विरून जाणे 
      त्यानंतर माझे मन निर्विचार झाले आणि मी माझ्या देवगण रूपातील अनुसंधानातील आनंद अनुभवू लागले. काही क्षणांनंतर मला शांतीची जाणीव झाली. पुढे काही मिनिटांनी मी डोळे उघडल्यावरही मला तीच अनुभूती येत होती. तसेच ५ दिवसांनंतरही मी तीच अनुभूती सतत घेत आहे. आता माझ्या मनात एखाद्या साधकाविषयी प्रतिक्रिया निर्माण होण्यापूर्वीच मला त्याच्या आणि माझ्या या अनुभूतीतील देवगणाच्या रूपाची जाणीव होते आणि माझ्या मनातील प्रतिक्रिया विरून जाते. 
४. स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या प्रक्रियेला एक नवा आयाम 
मिळाल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त होणे 
      या अनुभूतीच्या माध्यमातून माझ्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या प्रक्रियेला एक नवी दिशा मिळाली. त्यामुळे मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे. ‘हे गुरुमाऊली, आम्हा सर्व साधकांना आमचे स्वभावदोष आणि अहं यांवर मात करण्यासाठी तू करत असलेल्या साहाय्याचा पूर्ण लाभ करून घेता येऊ दे. तुला अपेक्षित अशा विहंगम गतीने आमची आध्यात्मिक उन्नती तूच करवून घे’, अशी तुझ्या चरणी अनन्यभावे प्रार्थना आहे.’ 
- डॉ. (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn