Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शासनाच्या प्रोत्साहनाची परिणती !

संपादकीय
       परवा एक डिसेंबर या दिवशी झारखंड राज्यात घडलेला एक प्रसंग पहा. एका व्यक्तीनेे तिचे वाहन वाहनतळावर उभे करण्याविषयी चूक केली. त्या चुकीचा दंड वसूल करतांना नियमापेक्षा अधिक रक्कम वसूल केली; म्हणून त्या व्यक्तीच्या पत्नीने वाहतूक पोलिसाला चपलेने चोपले. देशवासियांनी त्या महिलेच्या कृतीला दाद दिली आहे. ब्रिटीशकालापासून चालत आलेला पोलिसावर हात न उगारण्याचा नियम या महिलेने मोडला. यापुढे त्या पोलिसाने नियमापेक्षा अधिक पैसे घेतले म्हणून न्यायालयात प्रकरण चालणार कि पोलिसावर हात उगारला म्हणून चालणार, हे पहाण्यासाठी थांबावे लागेल. त्या महिलेने वाहतूक पोलिसाला चोपले, यामागील कारण लक्षात घ्यावे लागेल. वाहतूक पोलीस वाहनचालकांना विविध प्रकारे छळतात आणि त्यामागील त्यांचा उद्देश आर्थिक लाभ हाच असतो, ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. यामुळे जनतेच्या मनात वाहतूक पोलिसांविषयी पूर्वग्रह आहे. जेथे त्यांचा हेतू पूर्ण होत नाही, तेथे वाहनचालकाला अवाच्या सवा दंड वसूल करून त्रास देण्याची त्यांची मानसिकता वाहनचालक ओळखू शकतात. वाहतूक खात्यात अशा मानसिकतेचे कर्मचारी आहेत, तर इतर सार्वजनिक ठिकाणीही जनतेला तिच्या कामासाठी हैराण करणारे कर्मचारी असतात. जनतेची नियमित कामे करण्यासाठी तिच्याकडून अधिकाराने पैसे मिळवण्याची त्यांची नीती झालेली आहे. मागील ७० वर्षे काँग्रेसी राजवटीत या प्रकारांना आळा घालण्याचा विचार झालेला नाही. आज मात्र देशाचे शासन देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या प्रयत्नांत आहे. मोठ्या मूल्याच्या नोटा कोणतीच कल्पना न देता चलनातून रद्दबातल ठरवण्याचा केंद्रशासनाचा निर्णय, शासन भ्रष्टाचार निपटण्यासाठी कटिबद्ध असल्याचे द्योतक आहे. जनतेची त्याविषयी खात्री झालेली असल्याने जनताही केंद्रशासनाबरोबर आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी जनतेला कुणाची भीती वाटत नाही. झारखंड राज्यातील उपरोक्त प्रसंग त्याचेच उदाहरण आहे. पंतप्रधान मोदी तर म्हणत आहेत की, २१ व्या शतकातील भारतात भ्रष्टाचाराला थारा नाही. जनतेला मिळालेला तो मोठा आधार आहे. जनतेला शासनाकडूनच जर प्रोत्साहन मिळत असेल, तर शासनाच्या कार्यक्रमात ती सहभागी का होणार नाही ?
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn