Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विश्‍वासघातकी बँक अधिकार्‍यांना जन्मठेप द्या ! - योगऋषी रामदेवबाबा

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रमाणेच योगऋषी रामदेवबाबा यांनी
प्रतिक्रिया दिली आहे. सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी अशीच प्रतिक्रया व्यक्त करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
     नवी देहली - देशाचा विश्‍वासघात करणार्‍या बँक अधिकार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी योगऋषी रामदेवबाबा यांनी केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या बेहिशोबी नवीन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही बँकांचे अधिकारी सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे योगऋषी रामदेवबाबा यांनी वरील मागणी केली आहे.     योगऋषी रामदेवबाबा पुढे म्हणाले, नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुसंख्य लोकांना त्रास झाला. प्रतिदिन कमाई करून खाणारे पोटापाण्याच्या व्यवस्थेवर पाणी सोडून बँकांबाहेर रांगेत उभे रहात आहेत.
      अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत बँकेतील लोकांनी घोटाळे केले, घोटाळेबाजांना साहाय्य केले. अशा विश्‍वासघाताची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. नवीन वर्ष चालू होण्यापूर्वी नोटांचा प्रश्‍न दूर झाला पाहिजे. नोटाबंदी सहन करणार्‍या जनतेला जर दिलासा मिळाला नाही, तर लोकांचा प्रशासनावरचा आणि सरकारवरचा विश्‍वास उडू शकतो. असे होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn