Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सोलापूर येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस !

हिंदु धर्मजागृती सभेत वक्त्यांनी शौर्यदिन साजरा करण्याचे आवाहन केल्याचे निमित्त !
  • आज शौर्यदिन साजरा करण्याचे आवाहन केले म्हणून नोटीस बजावून हिंदुत्वनिष्ठांना छळणारे पोलीस भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागवणार्‍या प्रत्येक कार्यक्रमावर बंदी आणतील, हे लक्षात घ्या ! 
  • हिंदुत्वनिष्ठांना नोटीस बजावणारे पोलीस उघड सभांतून हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी यांना नोटीस बजावण्याचे धारिष्ट्य दाखवतात का ?
     सोलापूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - येथे ४ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानात हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या सभेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ६ डिसेंबर हा शौर्यदिन म्हणून साजरा करा, या हिंदूंना केलेल्या आवाहनाचे निमित्त करून येथील पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली, तसेच या आवाहनामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास यास संपूर्णपणे आपणास उत्तरदायी धरून कारवाई केली जाईल, असे म्हटले.
१. हिंदु धर्मजागृती सभेत श्री. सुनील घनवट म्हणाले होते, ६ डिसेंबर याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा शत्रू अफझलखान याचा कोथळा काढला होता, तसेच याच दिवशी तत्कालीन काँग्रेस शासनाने प्रचंड प्रमाणात पोलीस आणि सैन्यदल तैनात करूनही रथयात्रेसाठी आलेल्या लाखो धर्मवीर हिंदूंनी शौर्याने अयोध्येत यशस्वी आंदोलन केेले होते; म्हणून समस्त हिंदूंनी हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा करावा. खरे तर अफझलखान वधाचे चित्र लावणे याला कायद्याने बंदी नाही; परंतु त्यावर अघोषित बंदी निर्माण करण्यात आली आहे. हा हिंदूंच्या शौर्याचा दिन आहे. कोथळा काढल्याचा इतिहास खोटा नाही. त्यामुळे अशा प्रकारचे फलक लावू शकतो किंवा कपड्यांवर चित्र छापून घेऊन शकतो.
२. या संदर्भात पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे, या छायाचित्रामुळे अगोदरच राज्यभरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे येथेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. याच दिवशी महापरिनिर्वाण दिन असल्याने मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येत असतात. आपल्या या आवाहनामुळे जर काही अनुचित प्रकार घडल्यास यास संपूर्णपणे आपणास उत्तरदायी धरून कारवाई केली जाईल, तरी आपण असा कोणताही कार्यक्रम करण्यापासून परावृत्त व्हावे. 
३. या नोटिसीमध्ये अफझलखानाचा कोथळा ऐवजी औरंगजेबाचा कोथळा असा उल्लेख करण्यात आला आहे. (हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्याची पोलिसांना एवढी घाई झाली की, ते छत्रपतींचा इतिहासही विसरून गेले कि काय ? - संपादक)
४. रात्री ९ वाजता येथील हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. हिरालाल तिवारी यांना अन्य एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून दूरभाष करून सदर बाजार पोलीस चौकीत बोलावले आणि १४९ ची नोटीस दिली. 
५. ६ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांना विजापूर नाका पोलीस ठाण्यामधून २ वेळा दूरभाष आला. त्यांचा पत्ता विचारून आणि त्यांना घराबाहेर बोलावून त्यांची चौकशी चालू केली. 
६. या वेळी पोलिसांनी सौ. तिवारी यांना सांगितले, तुम्ही जर असे कार्यक्रम केले, तर तुम्हाला इथून पुढे अनुमती मिळणार नाही. तुम्ही सभेत हिंदूंना आवाहन का करता ? पोलिसांना कसले आवाहन असे विचारल्यावर त्यांनी वक्त्यांच्या भाषणातील काही भाग सांगितला. त्या वेळी सौ. तिवारी म्हणाल्या, इतिहास किंवा वस्तूस्थिती सांगणे म्हणजे गुन्हा आहे का ? या वेळी पोलिसांनी सभेतील वक्त्यांचीही चौकशी केली. 
७. या वेळी एक उपनिरीक्षक आणि ३ पोलीस आले होते. पोलीस गेल्यावर १५ मिनिटांनी २ पोलीस परत आले आणि त्यांनी १४९ ची नोटीस दिली. 
८. या नोटिसीमध्ये अफझलखानाच्या उल्लेखाऐवजी औरंगजेब असा उल्लेख करण्यात आला होता. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सौ. तिवारी यांच्याकडे नोटीस परत मागितली. सौ. तिवारी यांनी नोटीस देण्याचे नाकारले. पोलिसांनी वरील शब्दात पालट करून परत नोटीस दिली. श्री. हिरालाल तिवारी यांनाही सुधारित नोटीस दिली.
९. सभेची निमंत्रणपत्रिका छापणारे श्री. योगेश तुरेराव यांना ५ डिसेंबरला दुपारी त्यांच्या कार्यालयात जाऊन पोलिसांनी १४९ ची नोटीस दिली. त्यांच्या मुद्रणालयाची वरवर पाहणी केली. त्यांना विचारले, तुम्ही किती पत्रके छापली ? प्रक्षोभक काही छापले का ? या वेळी पोलिसांनी त्यांना अफझलखानवधाचे चित्र दाखवून असे काही छापले का ? असे विचारले. या वेळी श्री. तुरेराव यांनी सांगितले, समितीचे कार्य चांगले आहे. त्यात आक्षेपार्ह काही नाही. म्हणून मी ४ वर्षे त्यांना साहाय्य करत आहे. (पोलिसांच्या चौकशीला खंबीरपणे सामोरे जाणारे श्री. तुरेराव यांचे अभिनंदन ! असे हिंदुत्वनिष्ठ हेच धर्माची शक्ती ! - संपादक) कार्यकर्त्यांना नोटीस दिल्यानंतर श्री. योगेश तुरेराव यांची नोटीस पोलिसांनी परत नेली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn