Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शेवगाव (जिल्हा नगर) येथे दत्त जन्मोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

फुलांनी सजवलेल्या श्री दत्ताच्या पाळण्यासमवेत भक्तगण
श्री दत्ताची मनोहारी मूर्ती
     शेवगाव (जिल्हा नगर) - योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगाव (जिल्हा नगर) येथील वैशंपायन नगरमधील श्री दत्त देवस्थानात दत्त जन्मोत्सवाचा सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला. थंडीतही भाविक-भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती. सलग तीन दिवस भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे वैशंपायन नगरमधील मातीतून जणू काही सुगंध दरवळत होता, असे भक्तांना जाणवले.
     गुरुदत्त सामाजिक संस्था संचलित श्री दत्त देवस्थानात श्री दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र या प्रासादिक ग्रंथाचे पारायण, श्री दत्त याग, ५१ लक्ष्मी-नारायण जोडप्यांकरवी सत्यदत्त, सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.
     श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने भल्या सकाळी श्री दत्तात्रेयांच्या संगमरवरी मूर्तीला पंचसूक्त पवमान अभिषेक दत्त भक्त आणि साधक समूहाच्या हस्ते घालण्यात आला. दुपारी भव्य-दिव्य पालखी सोहळा पार पडला. फुलांनी सजवलेल्या पालखीत योगतज्ञ दादाजींचे छायाचित्र आणि श्री दत्तात्रेेयांची मूर्ती ठेवण्यात आली होती. श्री दत्त जन्मोत्सवाच्या वेळी श्री दत्त मूर्ती वेगवेगळ्या आकर्षक फुलांनी सजवल्याने तेज:पुंज आणि मनमोहक होती. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn