Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दत्तगुरूंची काळानुसार आवश्यक उपासना !

१. दत्ताच्या उपासनेविषयी धर्मशिक्षण देणे
      बहुतांश हिंदूंना आपल्या देवता, आचार, संस्कार, सण आदींविषयी आदर आणि श्रद्धा असते; परंतु त्यांच्या उपासनेमागील धर्मशास्त्र ठाऊक नसते. शास्त्र समजून घेऊन धर्माचरण योग्यरित्या केल्यास अधिक फलप्राप्ती मिळते. त्यामुळे दत्ताच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र यांविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे, ही दत्तभक्तांसाठी काळानुसार आवश्यक अशी श्रेष्ठ स्तराची समष्टी साधना आहे. 
२. दत्त मंदिरात पावित्र्य राखावे !
अ. दत्ताच्या किंवा अन्य मंदिरात दर्शनासाठी झुंबड करू नये. ओळीने अन् शांतपणे दर्शन घ्यावे. शांतपणे भावपूर्ण दर्शन घेतल्यानेच दर्शनाचा खरा लाभ होतो.
आ. देवळात किंवा गाभार्‍यात गोंगाट करू नये. गोंगाट केल्यामुळे देवळातील सात्त्विकता घटते, तसेच तेथे दर्शन घेणार्‍या, नामजप करणार्‍या किंवा ध्यानाला बसलेल्या भाविकांनाही त्याचा त्रास होतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn