Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘सनबर्न फेस्टिव्हल’ रहित होण्यासाठी पुणे येथे न्यायालयात दावे प्रविष्ट !

     पुणे - अमली पदार्थ, मद्य यांचा मुक्त वापर असलेल्या ‘सनबर्न’ या संगीत महोत्सवाला नागरिकांचा विरोध वाढत असून आता हा महोत्सव कायद्याच्या कचाट्यातही सापडला आहे. हा महोत्सव रहित होण्यासाठी येथील शिवाजीनगर न्यायालयात दिवाणी आणि फौजदारी दावे दाखल झाले आहेत. १७ डिसेंबर या दिवशी झालेल्या पहिल्या सुनावणीच्या वेळी खटल्यासाठी १९ डिसेंबरची पुढची तारीख देण्यात आली. माहिती सेवा समितीचे श्री. चंद्रकांत वारघडे आणि श्री. गणेश म्हस्के यांनी अधिवक्ता वाजीद खान यांच्या माध्यमातून हे खटले प्रविष्ट केले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ, ‘सनबर्न फेस्टिवल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी करण सिंग आणि जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 
वादीच्या वतीने करण्यात आलेल्या निवेदनांत म्हटले आहे की, 
१. ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये तिरंग्याचा अवमान करण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. 
२. वर्ष २०१३ मध्ये गोव्यातील वागोतोर किनार्‍यावर अमली पदार्थविरोधी पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये अमली पदार्थांचा दलाल सौरभ अगरवाल याला चरससहित अटक करण्यात आली होती. मादक द्रव्यांचे अतिसेवन केल्याने २ मुलींचा जीव जाण्याची घटनाही या वेळी घडली होती. 
३. अमली पदार्थ विरोधी पथकाला या कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक तरुण-तरुणी सार्वजनिकरित्या हुक्का आणि चिलिम ओढतांना, तसेच तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या प्रसाधनगृहात अमली पदार्थांचे सेवन करतांना आढळले होते. 
४. वर्ष २००९ मध्ये गोव्यातील कांदोली किनार्‍यावर नेहा बहुगुणा या २३ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला होता. 
५. वर्ष २०१३ मध्ये झालेल्या महोत्सवाच्या वेळी अमली पदार्थ विरोधी पथकाला ‘केटामीन’ या ड्रग्जच्या (महिलांचे शोषण करण्यासाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज) ४५० बाटल्या मिळाल्या होत्या. 
६. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे तरुणांना वाममार्गाला लावण्याचे माध्यम आहे. 
७. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही करण्यात आली आहे. 
८. या पार्श्‍वभूमीवर पुणे-नगर महामार्गावरील केसनंद येथे होऊ घातलेला ‘सनबर्न’ संगीत महोत्सव रहित करण्यात यावा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn