Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नागपूर येथे पोलिसांच्या अस्वच्छ टँकरमधून पोलीस आणि आंदोलनकर्ते यांना पाणीपुरवठा !

पोलीस आणि महापालिका प्रशासन यांचा ढिसाळ कारभार !
     नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) - येथे हिवाळी अधिवेशन चालू झाल्यानंतर राज्यातील विविध संघटनांच्या वतीने त्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येते. शासनाने विविध संघटनांना विधानभवनाजवळील यशवंत मैदानात मंडप घालून आंदोलन करण्यास अनुमती दिली आहे. तेथे विविध संघटनांच्या वतीने अधिवेशन चालू झाल्यापासून आंदोलन चालू आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मैदानात चंद्रपूर पोलीस मुख्यालयातील पोलिसांचा पाण्याचा एक टँकर ठेवण्यात आला आहे. खरेतर पोलिसांच्यासाठी हा पाण्याचा टँकर ठेवण्यात आला आहे. तथापी, यातून आंदोलनकर्ते पिण्यासाठी पाणी घेत आहेत; मात्र या टँकरकडे पाहिल्यास त्याच्यावर धूळ बसलेली दिसते. बरेच दिवस हा टँकर स्वच्छ केलेला दिसत नाही. त्याला रंगही न दिल्यामुळे तो गंजलेला दिसत आहे. त्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्ते यांना स्वच्छ पाणी मिळते का ? पोलीस आणि आंदोलनकर्ते यांसाठी महापालिकेने पाण्याचा टँकर का आणून ठेवला नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (या प्रश्‍नाकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे लक्ष आहे कि नाही ? पोलिसांच्या अशा अस्वच्छ टँकरमधून पाणी पिऊन कोणी दगावल्यास अथवा आजारी पडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? प्रशासनाने तेथे स्वच्छ पाण्याचा टँकर दिला पाहिजे. ही गोष्ट महापालिका प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn