Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोल्हापूर येथे पाणी प्रश्‍नावरून नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात वादावादी !

नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनाला कुलूप ठोकले !
     कोल्हापूर - महानगरपालिकेत महानगरपालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्यामध्ये पाण्याच्या प्रश्‍नावरून वादावादी झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या दालनालाच कुलूप ठोकले. ही घटना ९ डिसेंबरला घडली आहे. नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन गोंधळही घातला. त्यामुळे महानगरपालिकेच्या परिसरात काही काळासाठी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
     शहरातील पाणीपुरवठा आणि पाणी गळतीचा प्रश्‍न दिंवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे; मात्र महानगरपालिकेचे अधिकारी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पहायला सिद्ध नाही. त्यामुळे आज संतापलेल्या नगरसेवकांनी वरील कृत्य केले. त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर हे पोलिसांना घेऊन कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे उपस्थित असणारे नगरसेवक पोलिसांना घेऊन का आलात ? असा जाब विचारत त्यांना धारेवर धरले. या वेळी आयुक्तांसमवेत सुरक्षा देण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकारी आणि नगरसेवक यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे गोंधळाच्या वातावरण आणखी भर पडली.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn