Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी सरकार गंभीर नाही !

स्वतःच्या पक्षाच्या सत्ताकाळात कायदा सुव्यवस्थेची लक्तरे
निघालेेली असतांना त्याविषयी ब्रही न काढणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वक्तव्य !
     नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - राज्यातील गुन्हेगारीची वाढती संख्या पहाता राज्य सरकारने जनतेचा अंत पाहू नये. अन्यथा जनता सत्तेचा माज उतरवेल. एकूणच राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी सरकार गंभीर नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावातील गृह खात्यावर आयोजित केलेल्या चर्चेचा प्रस्ताव सादर झाला. यामध्ये अन्य सदस्यांनीही कायदा सुव्यवस्थेच्या चर्चेत सहभाग घेतला. या चर्चेला अंतिम उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ डिसेंबर या दिवशी देणार आहेत.
     मुंडे पुढे म्हणाले की, राज्यात गुन्हेगारी वाढत असून नागपूर ही गुन्हेगारीची राजधानी झाली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार, आश्रम शाळांमध्ये वाढते अत्याचार, पोलीस असुरक्षित असणे, आतंकवादी आक्रमणांची शक्यता अशी कायद्याची भयावह स्थिती आहे. यामुळे उद्या नागपूर हे गुन्हेगारीमध्ये देशाची राजधानी व्हायला नको. मुख्यमंत्र्यांचा गृह खात्यावर दबदबा नाही. सध्याचे सरकार हे हिंदुत्व आणि हिंदु संस्कृती जोपासणारे असूनही नागपूरमध्ये नाईट लाईफ वाढत आहे. नागपूरमध्ये रात्री उशिरा अवैध शस्त्रे मिळणे, अवैध मटका आणि मद्य यांचे अड्डे चालू स्थितीत आढळतात. याचा परिणाम म्हणून नागपूरमध्ये राजकीय गुन्हेगारीही वाढते आहे. (वाण्याच्या दुकानातून बिअर द्या, धान्यापासून मद्य बनवा, अशा संकल्पना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडल्या होत्या. मुख्यमंत्री नाईट लाईफला कायद्याच्या माध्यमातून प्रतिबंध घालण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न करतात, तेव्हा विराधी पक्षांना बारबालांचा कळवळा येतो. यावर मुंडे यांना काय म्हणायचे आहे ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn