Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

डॉ. झाकीर नाईक यांचे समर्थन केल्याप्रकरणी अबू आझमी यांच्यावर देशद्रोेहाचा गुन्हा प्रविष्ट करा !

  • अबू आझमी यांच्यासारख्या धर्मांधांना प्रस्थापित व्यवस्थेचे भय न राहिल्यामुळेच लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणार्‍या विधानसभेच्या सभागृहात ते आतंकवादाला खतपाणी घालणारे डॉ. झाकीर नाईक यांचे उघड समर्थन करण्यास धजावतात ! त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
  • आमदार अनिल गोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे आणि औचित्याच्या सूत्राद्वारे मागणी
        नागपूर, ९ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष डॉ. झाकीर नाईक यांनी आतंकवाद्यांना आश्रय देण्याविषयी वक्तव्य केले होते. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औचित्याच्या सूत्राद्वारे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनविषयीचे सूत्र विधानसभेत मांडून सभागृहाच्या विशेषाधिकाराचा अपलाभ घेतला आहे. अशाप्रकारे अबू आझमी यांनी डॉ. झाकीर नाईक यांचे उघड समर्थन केले असून त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर याविषयी बेताल वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची नोंद घेऊन आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा प्रविष्ट करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार श्री. अनिल गोटे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री श्री. देेवेंद्र फडणवीस यांच्याकडे ९ डिसेंबरला केली आहे. विशेष म्हणजे श्री. अनिल गोटे यांनी विधानसभेत खास औचित्याचे सूत्र मांडून अबू आझमी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. (विधानसभेतील २८९ आमदारांपैकी केवळ भाजपचे आमदार श्री. अनिल गोटे यांनी तीन टप्प्यात शासनाकडे अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याविषयी त्यांचे अभिनंदन ! श्री. अनिल गोटे यांनी मांडलेले सूत्र देशहिताचे असल्याने त्यांना इतर आमदारांनी पाठिंबा देऊन देशहिताच्या विरोधात काम करणार्‍या लोकप्रतिनिधींच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी प्रविष्ट कराव्यात, एवढीच भाजप आणि शिवसेना यांच्या आमदारांकडून अपेक्षा आहे. - संपादक)
अबू आझमी आणि अनिल 
गोटे यांच्यात शाब्दिक चकमक !
        अबू आझमी यांनी ८ डिसेंबरला विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन यांच्या शैक्षणिक संस्थेचे सूत्र विधानसभेत उपस्थित करून डॉ. नाईक यांना पाठिंबा दिला होता. हे सूत्र मांडत असतांना भाजपच्या काही आमदारांनी अबू आझमी यांना विरोध दर्शवला होता. त्यामध्ये आमदार श्री. अनिल गोटे हेही होते. अबू आझमी हे औचित्याचे सूत्र मांडून विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर आमदार श्री. अनिल गोटे यांनी त्यांना गाठून हे सूत्र मांडल्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती. याचा राग आझमी यांना आला होता. त्यामुळे या सूूत्रावरून गोटे आणि आझमी यांच्यात प्रसारमाध्यमांसमोरच शाब्दिक चकमक उडाली.
अबू आझमी यांचे वक्तव्य कामकाजातून 
काढून टाकावे ! - विधानसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी
        आमदार अबू आझमी यांनी डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीविरुद्ध केलेले वक्तव्य हे राज्य आणि देश यांच्या हिताविरुद्ध आहे. डॉ. झाकीर नाईक हे देश सोडून फरार झाले आहेत. अशा व्यक्तीच्या समर्थनार्थ विधीमंडळाच्या सभागृहाचा अपवापर आणि दुरुपयोग करणे म्हणजे अतिरेकी कारवायांचे समर्थन करणे होय, असे माझे स्पष्ट मत आहे. देशहिताच्या व्यापक दृष्टीकोनातून या घटनेकडे पाहिल्यास हे देशद्रोही कृत्य आहे. त्यामुळे आझमी यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी अनिल गोटे यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
केंद्र सरकारच्या कारवाईला पाठिंबा न देणे 
म्हणजे देशद्रोह असल्याने कारवाई करावी ! 
- औचित्याच्या सूत्राद्वारे मागणी
        डॉ. झाकीर नाईक यांनी आतंकवाद्यांना केलेले साहाय्य, याविषयी सापडलेले पुरावे याचा साकल्याने विचार करून केंद्र सरकारने त्यांच्यावर टाकलेली बंदी योग्यच आहे. तसेच इस्लामिक राष्ट्रातून त्यांच्या संस्थेला मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असल्याने देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. एका विशिष्ट धर्मियांना (मुसलमानांना) चेतवण्याचे चालू असलेल्या कारस्थानाविरुद्ध शासनाने केलेल्या कारवाईला पाठिंबा न देणे म्हणजे हा देशद्रोहच आहे. याची नोंद घेऊन शासनाने त्वरित आझमी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी श्री. अनिल गोटे यांनी ९ डिसेंबरला औचित्याच्या सूत्राद्वारे विधानसभेत केली.
इस्लामिक देशांकडून डॉ. झाकीर 
नाईक यांना मिळाले ६० कोटी रुपये !
        श्री. अनिल गोटे म्हणाले, डॉ. झाकीर नाईक यांना इस्लामिक देशांकडून गेल्या ३ वर्षांत ६० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांनी अबू अलस या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला ८० सहस्र रुपये शिष्यवृत्ती दिल्याचे सिद्ध झाले आहे. बांगलादेशाची राजधानी असलेल्या ढाका शहरातील कॉफी हाऊसमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. डॉ. झाकीर नाईक यांनी केलेल्या भाषणांमुळे असे करण्यास प्रेरणा मिळाली, असे आतंकवाद्यांनी सांगितले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn