Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदूंच्या लहान मुलांच्या जिवाशी खेळणे हे धर्मांधांचे षड्यंत्र ?

       ‘मुले ही देवाघरची फुले’ असे आपण मानतो. लहान मुलांचे मन निर्मळ असल्याने त्यांच्यामध्ये देवाचा अंश अधिक असतो. ती सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. मुंबईत काही दिवसांपूर्वी घडलेली घटना मात्र माणुसकीला काळीमा फासणारी आहे. खारघर येथे ‘पूर्वा प्ले स्कूल’ या पाळणाघरात १० महिन्यांच्या मुलीला एका महिलेने अमानुषपणे मारहाण केली. ही घटना केवळ निंदनीयच नसून संतापजनक आहे. अफसाना शेख असेे या धर्मांध महिलेचे नाव आहे. ही धर्मांध महिला यापूर्वी ज्या घरात कामाला होती, ते ही एका हिंदूंचेच घर होते. तेथेही घरातील लहान मुलगी फरशीवरून पाय घसरून पडली तेव्हा या महिलेने ‘मुले मरत का नाहीत ?’ असे म्हटले. यानंतर तिला कामावरून काढून टाकले होते.
        या सर्वांतून तिचा हिंदुद्वेषच दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी एका धर्मांध चालकाने विद्यार्थ्यांना नेतांना गाडीचा जाणूनबुजून अपघात घडवून आणला होता. यात ८ हिंदु विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यातही या धर्मांध चालकाचा हिंदुद्वेषच होता. आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांमधून हिंदु युवतींवर अत्याचार केले जात होते. आता या नवीन प्रकारातून हिंदूंच्या लहान मुलांना लक्ष्य केले जात आहे. हिंदु मुलांच्या जिवाशी खेळणे धर्मांधांचे हे नवीन षड्यंत्र आहे.
सर्वधर्मसमभावाचे वेड पांघरल्याने हिंदूंची दु:स्थिती ! 
     ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द सध्याच्या हिंदूंना भूषणावह वाटतो. खरेतर सर्वधर्मसमभावाचे हे वेड पांघरून घेतल्यानेच बेसावध असणार्‍या हिंदूंशी धर्मांध मात्र कपटाने वागत असतात, हे त्यांच्या लक्षात येत नाही. हिंदू भेद मानत नसल्याने सर्वांशी सारखे वागायला जातात; मात्र धर्मांधांच्या मनात त्यांच्याविषयी द्वेषभावना असते. ‘लव्ह जिहाद’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. धर्मांधांची ही धर्मांधता आज हिंदूंच्या गळ्यापर्यंत येऊनही बहुसंख्य हिंदूंच्या ते लक्षात आलेले नाही. त्यातच बुद्धीभेद करणार्‍या पुरो(अधो)गाम्यांमुळे धर्माविषयीचे अज्ञान सर्वत्र पसरत आहे. अल्पसंख्यांकांवर आक्रमणे झाल्यास ती असहिष्णुता असते; मात्र हिंदूंवर आक्रमणे झाल्यानंतर त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. 
धर्माभिमान आणि हिंदूंचे संघटन आवश्यक ! 
    हिंदूंनी मात्र धर्मांधांची ही द्वेषभावना आणि क्रूरता ओळखून वेळीच सतर्क व्हायला हवे. आणि सर्वधर्मसमभाव या संकल्पनेमागील फोलपणा लक्षात घ्यायला हवा. व्यवहारात धर्मांध चालक, आया यांच्याकडे, तसेच अन्य ठिकाणीही धर्मांध असल्यास त्यांच्याकडे आपली मुले सुपुर्द करायची का, हे हिंदूंनी ठरवायला हवे. या घटनेतील दोषी महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदूंनी करायला हवी, तसेच पोलिसांनीही दबावापोटी धर्मांधांना मोकळीक देण्याची वृत्ती बाजूला सारली पाहिजे. हिंदू संघटित झाल्यास तसेच त्यांच्यामध्ये धर्माभिमान निर्माण झाल्यास त्यांच्याकडे कुणाचेही वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही ! 
- कु. प्राजक्ता धोतमल, मुंबई
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn